वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
लंडन : पृथ्वीवरून स्मार्टफोन संपणार, असा दावा तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेटस यांनी केला आहे. त्यांनी येत्या काळात स्मार्टफोनचा वापर पूर्णपणे बदलेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. या स्मार्टफोनची जागा इलेक्ट्रॉनिक टॅटू घेतील, असे भाकीतही त्यांनी केले आहे.
तंत्रज्ञानाच्या जगात वेगाने बदल होत आहेत. आज येणाऱ्या तंत्रज्ञानात अवघ्या काही तासांत बदल होतो. जग रजी, ३जी आणि ४जी वरून आता ५जी कडे झेपावले आहे. लवकरच काही देश ६जी लाँच करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, आता जगात आणखी एका तंत्रज्ञानाची भर पडत आहे. ती म्हणजे इलेक्ट्रॉनिक टॅटूची. या इलेक्ट्रॉनिक टॅटूमुळे आगामी काळात स्मार्टफोनचे अस्तित्व पथ्वीवरून नाहीसे होणार आहे.
स्मार्टफोनमध्ये सतत काहीना काही बदल होत आहेत. ते दिवसेंदिवस हायटेक होत आहेत. मोबाइल वायरलेस चार्जिंग, सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी आणि फास्ट चार्जिगने सुसज्ज आहेत. मात्र, आता तंत्रज्ञानाच्या जगात आणखी एका तंत्रज्ञानाची भर पडत आहे. ती म्हणजे इलेक्ट्रॉनिक टॅटूची. या इलेक्ट्रॉनिक टॅटूमुळे आगामी काळात स्मार्टफोनचे अस्तित्व पृथ्वीवरून नाहीसे होणार आहे.
इलेक्ट्रॉनिक टॅटू ही एक प्रकारची चिप आहे. ही चिप मानवी शरीरात सहजपणे बसवता येते. जी दिसायला टॅटूसारखी असेल. ही इलेक्ट्रॉनिक चिप स्मार्टफोन ज्या गोष्टी करणार आहे त्या सर्व गोष्टी करू शकणार आहे.
अशा परिस्थितीत इलेक्ट्रॉनिक चिप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला स्मार्टफोनची गरज भासणार नाही. बिल गेटस यांच्या या दाव्यावर विश्वास ठेवला तर येत्या काही दिवसांत तुम्हाला स्मार्टफोन खिशात घेऊन फिरावे लागणार नाही. इलेक्ट्रॉनिक टॅटूच्या मदतीने एक व्यक्ती संपूर्ण जगाशी जोडली जाईल.