नवी दिल्ली : मोबाईलवर गेम खेळण्याची सवय केवळ लहान मुलांनाच असते असे नाही. अनेक तरुण व प्रौढ लोकांनाही ही सवय असते. ‘इंडिया मोबाईल ऑफ गेमिंग’च्या अहवालानुसार, भारतीय लोक आठवड्यातून सरासरी ८.३६ तास मोबाईल गेम खेळण्यात घालवतात. ६० टक्के गेमर्स एका वेळी सतत तीन तास गेम खेळतात. मोबाईल गेमच्या व्यसनात उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र दुसऱ्या आणि राजस्थान तिसऱ्या क्रमांकावर आहे. बिहार चौथ्या आणि पश्चिम बंगाल पाचव्या क्रमांकावर आहे. २०२० मधील एका अहवालात असे दिसून आले आहे. की, ६५ टक्के मुले ऑनलाईन गेमिंगसाठी जेवण आणि झोप सोडण्यास तयार असतात. मानसशास्त्रज्ञांच्या मते, लोक सहसा वेळ घालवण्यासाठी गेम खेळू लागतात. मात्र याचे केव्हा व्यसनात रुपांतर होते आणि जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनते, हे खेळणाऱ्यांना कळत नाही.
About The Author
Post Views: 84