सततचा ताण, स्पर्धात्मक जीवनशैली, सोशल मीडियाचं दडपण, आणि अनियमित झोप यामुळे सध्या मानसिक आरोग्याचं संकट वाढताना दिसत आहे.

“मानसिक आरोग्य ही आरोग्याची एक महत्त्वाची बाजू आहे. फक्त शारीरिक नव्हे, तर मनाचं आरोग्यही तितकंच आवश्यक आहे. यावर ध्यान, संवाद आणि व्यायाम हे त्रिसूत्री उपाय आहेत.”

चिंता (Anxiety) म्हणजे काय? चिंता ही शरीराची एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. मात्र ती सतत आणि कारणाशिवाय जाणवू लागली, की ती disorder बनते.

सामान्य लक्षणेः छातीत धडधड वाढणे. झोप न लागणे. भीती वाटणे. प्रत्येक गोष्टीचा ताण घेणे. अचानक रडू येणे.

नैराश्य (Depression) म्हणजे केवळ दुःख नव्हे. नैराश्य ही एक मानसिक स्थिती असून ती दीर्घकाळ टिकते आणि व्यक्तीच्या विचारसरणीवर, वागणुकीवर आणि दैनंदिन जीवनावर परिणाम करते.

लक्षणे : सतत उदास वाटणे. आवडत्या गोष्टींमध्ये रस न वाटणे. थकवा जाणवणे. आत्मविश्वास कमी होणे. आत्महत्येचे विचार येणे (गंभीर स्थिती).

उपाय: ध्यानधारणा आणि मानसिक स्वच्छता मानसिक तणावावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही साधे पण प्रभावी उपाय करता येतात:

२. जर्नलिंग आणि भावनांची नोंद: दररोज दिवसाच्या शेवटी आपल्या भावना, विचार लिहा. काय गोष्टी आनंद देतात याची यादी करा.

३. थेरपी किंवा सल्लागारांची मदतः मानसिक थेरपी घेणे ही कमजोरी नाही, तर ती स्वतःसाठी घेतलेली एक सकारात्मक पाऊल आहे. प्रशिक्षित मानसोपचार तज्ज्ञांकडे सल्ला घेणे कधीही चांगले असते.

४. योगासने आणि शारीरिक हालचाल: अनुलोम-विलोम, भ्रामरी प्राणायाम, शवासन या प्रकारांनी मन शांत राहतं. नियमित चालणे, व्यायाम करणे हेही सकारात्मक प्रभाव देतात.

ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स (साल्मन फिश, अक्रोड) मूड सुधारतात. डार्क चॉकलेट, फळं, पालक, कोबी, आणि संपूर्ण धान्ये मानसिक तणाव कमी करतात. कॅफिन आणि प्रोसेस्ड फूड्स टाळावेत.

समाजाने बदलायला हवे दृष्टिकोन "तुला इतकी काळजी कशाची आहे?", "डिप्रेशन म्हणजे लक्ष वेधून घेण्याचा प्रकार!"  अशा वाक्यांमुळे मानसिक आजारांकडे दुर्लक्ष होते.  त्याऐवजी: ऐका, समजून घ्या. सल्ला देण्याऐवजी साथ द्या.