सतीश मानेशिंदे हे देशातील हाय प्रोफाईल क्रिमिनल वकील म्हणून ओळखले जातात. अनेक नामांकित बॉलीवूड कलाकारांचे खटले त्यांनी लढले आहेत.
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा खटला असो वा संजय दत्त, सलमान खान यांसारख्या सुपरस्टार्सचे प्रकरण असो, सतीश मानेशिंदे हे नाव सतत चर्चेत राहिले आहे.
सतीश मानेशिंदे यांचे नाव प्रथम मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले ते 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात. या प्रकरणात त्यांनी अभिनेता संजय दत्त यांची बाजू मांडली होती. कायदेशीर दांवपेचांमुळे संजय दत्त यांना जामिन मिळाला.
काळवीट शिकार प्रकरणात तसेच ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणात त्यांनी सलमान खान यांना जामिन मिळवून दिला. यानंतर ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणात सलमान खान निर्दोषही सुटले.
सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर झालेल्या तपासादरम्यान अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा खटला घेतल्यामुळे सतीश मानेशिंदे पुन्हा एकदा चर्चेत आले.
सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर झालेल्या तपासादरम्यान अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा खटला घेतल्यामुळे सतीश मानेशिंदे पुन्हा एकदा चर्चेत आले.