Blood Group Stroke Risk | पूर्वी स्ट्रोक (Brain Stroke) हा केवळ वाढत्या वयातील लोकांमध्ये आढळणारा आजार मानला जात होता. मात्र, बदललेली जीवनशैली आणि तणावामुळे आता तरुण आणि मध्यमवयीन लोकांनाही स्ट्रोकचा धोका वाढला आहे. याच अनुषंगाने, एका नवीन आंतरराष्ट्रीय रिसर्चमध्ये एक धक्कादायक खुलासा झाला आहे. तुमचा रक्तगट (Blood Group) काय आहे, यावरून तुम्हाला 60 वर्षांच्या आत ब्रेन स्ट्रोक पडेल की नाही, याचा धोका निश्चित करता येतो. या संशोधनानुसार, काही विशिष्ट रक्तगट असलेल्या लोकांना इतरांपेक्षा स्ट्रोकचा धोका अधिक असतो.

ब्लड ग्रुप आणि स्ट्रोकचे कनेक्शन काय?
अमेरिकन अॅकॅडमी ऑफ न्यूरोलॉजी (American Academy of Neurology) च्या एका जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनानुसार, ‘ए’ (A) रक्तगट असलेल्या तरुण व्यक्तींना सर्वात जास्त धोका असतो, तर ‘ओ’ (O) रक्तगट असलेल्या व्यक्तींमध्ये स्ट्रोकचा धोका सर्वात कमी असतो.
संशोधनातील प्रमुख निष्कर्षः
• ‘ए’ रक्तगट (Blood Group A ) : तरुण वयात (६० वर्षांपूर्वी) स्ट्रोकचा धोका या रक्तगटाच्या लोकांमध्ये सर्वाधिक आढळतो. या रक्तगटातील लोकांना इतर रक्तगटाच्या लोकांपेक्षा स्ट्रोक होण्याची शक्यता १६ टक्के जास्त असते.
● ‘ओ’ रक्तगट (Blood Group O): या रक्तगटाच्या लोकांमध्ये तरुण वयात स्ट्रोक होण्याचा धोका सर्वात कमी असतो. हा धोका इतरांपेक्षा सुमारे १२ टक्के कमी असतो.
• इतर रक्तगट (B आणि AB): ‘बी’ (B) आणि ‘एबी’ (AB) या रक्तगटांच्या लोकांमध्ये स्ट्रोकचा धोका सरासरी (Average) असतो.
या अभ्यासासाठी सुमारे १६,७९८ स्ट्रोक रुग्ण आणि ६,००,००० पेक्षा जास्त निरोगी लोकांच्या आकडेवारीचे विश्लेषण करण्यात आले.