भावनाशीलतेपेक्षा विवेकाला प्राधान्य देणारे ‘वैचारिक व्यासपीठ’ : वऱ्हाडवृत्त
सर्वकाही प्रोफेशनलच्या काळात छापिल शब्दाचे पावित्र्य कायम आहे. वृत्तपत्राचे नाते नेहमी विश्वासार्हतेशी जोडले जाते. आपण छापील शब्दांवर विश्वास ठेवणारी माणसे आहोत. त्यामुळे जे छापले आहे, ते पवित्र आहे, अशी आपली दृढ भावना असते. हाच सुस्पष्ट ध्येयवाद घेऊन साप्ताहिक वऱ्हाडवृत्त मुद्रीत करून नियमित प्रकाशित करीत आहोत!

भारतीय राज्यघटनेच्या 19/1 कलमानुसार, अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. आणि वऱ्हाडवृत्त हा नागरिकांच्या अभिव्यक्तीचाच एक आरसा म्हणून आम्ही सर्वसमावेशक व तळातील जनतेचे प्रश्न मांडून समाजाभिमुख पत्रकारितेचा विशुध्द ध्वज घेऊन मार्गक्रमण करित आहोत. त्यामुळेच या छोट्या वृत्तपत्रानीही ही विश्वासार्ह परंपरा टिकवून ठेवली आहे.
प्रसारमाध्यमक्षेत्रात माहिती संपादनाची साधने विस्तारली असल्याने, तसेच व्यावसायिक गणिते सांभाळताना वृत्तपत्रांची कसरत होत असल्याने ‘वऱ्हाडवृत्त’ चे इंटरनेटच्या जगात ऑनलाईन न्युज पोर्टलद्वारे डिजीटल स्वरुपात आगमन झाले आहे. आमच्या वाचकांना जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंतचा फेरफटका मारून आणण्यासाठी, जगभरातील घडामोडींची आणि समाजस्पंदनांची जाणीव करून देण्याचे आम्ही ऑनलाइन पोर्टल माध्यमातूनही पत्रकारितचे व्रत जोपासणार आहोत!
ज्याच्या माध्यमातून समाजातील कोणत्याही क्षेत्रात घडणाऱ्या घटनांची तात्काळ माहिती देणे, लोकांना सतर्क करणे, मोहक मनोरंजन करणे, जगातील सर्व नवीन शोध, घटना आणि संशोधन यांचा परिचय करून देणे हे सहज शक्य होईल. हे करत असताना विश्वासार्हता, परोपकार, सामाजिक दायित्व जपणे ही आमची भूमिका असेल!
या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक-प्रकाशक सागर बाबाराव लोडम हे आहेत. सदर हे ऑनलाईन वृतपत्र सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाइन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असेलच असे नाही. (अकोला न्यायक्षेत्र)
संपर्क
कार्यालय : मुक्ता ग्राफिक्स, पाटणे मार्केट, रणपिसे नगर, अकोला (महाराष्ट्र) मो. 9850471520
ई.मेल. sagarlodam20@gmail.com
साप्ताहिक प्रकाशन Reg.No. MAHMAR/2016/71990
मुख्य संपादक-प्रकाशक, सागर बाबाराव लोडम
सहसंपादक – सौ.प्रियंका सागर लोडम