नवी दिल्ली: राष्ट्रीय राजधानीत आयोजित ‘कौटिल्य आर्थिक शिखर परिषदे २०२५’ चा रविवारी शेवटचा दिवस होता. याप्रसंगी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी परराष्ट्र धोरण आणि आर्थिक दृष्टिकोन यावर आपले विचार मांडले. त्यांनी स्पष्ट केले की भारत राष्ट्रीय क्षमता तसेच विविध स्त्रोतांशी सहकार्याद्वारे आपली ऊर्जा सुरक्षा, अन्न सुरक्षा आणि आरोग्य सुरक्षा […]
Category: महाराष्ट्र
कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे ११ मुलांचा मृत्यू; श्रीसन फार्मास्युटिकल्सच्या उत्पादनांवर बंदी, डॉ. प्रवीण सोनी अटकेत
भोपाळ : कोल्ड्रिफ कफ सिरप खाल्ल्याने देशभरात अनेक मुलांचा मृत्यू झाला आहे. एकट्या मध्य प्रदेशातच हे सिरप खाल्ल्याने ११ मुलांचा मृत्यू झाला. या घटनेने राज्य सरकारला आश्चर्याचा धक्का बसला आहे. सरकारने कोल्ड्रिफ कफ सिरपसह श्रीसन फार्मास्युटिकल्स कंपनीच्या सर्व उत्पादनांवर बंदी घातली आहे. दरम्यान, कफ सिरप लिहून देणाऱ्या डॉ. प्रवीण सोनी […]
झुबिन गर्ग मृत्यू प्रकरण: विष देऊन हत्या झाल्याचा दावा, न्यायिक चौकशी आयोग स्थापन
गुवाहाटी: आसामचे प्रसिद्ध गायक झुबिन गर्ग यांच्या मृत्यूचे गूढ आणखी वाढले आहे. चौकशीदरम्यान अटक करण्यात आलेले जुबिनचे बँड सदस्य शेखर ज्योती गोस्वामी यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात गोस्वामी यांनी आरोप केला आहे की झुबिन स्कूबा डायव्हिंग करताना बुडला नाही, तर सिंगापूरमध्ये त्याला विष देऊन मारण्यात आले. […]
FASTag नाही? टोल नियमांमध्ये मोठा बदल!
नवी दिल्ली: राष्ट्रीय महामार्गांवर FASTag नसलेल्या किंवा दोषपूर्ण असलेल्या वाहनचालकांना केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण दिलासा दिला आहे. आता, अशा वाहनचालकांना UPI द्वारे पैसे भरल्यास दुप्पट टोल टॅक्स भरण्यापासून सूट मिळेल. सरकारने जाहीर केले आहे की हा नवीन नियम १५ नोव्हेंबर २०२५ पासून देशभर लागू केला जाईल. सरकारने राष्ट्रीय महामार्ग शुल्क (दर […]
ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन.
संध्या शांताराम यांचे निधन ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. “झनक झनक पायल बाजे”, “दो आंखे बारह हात”, “नवरंग” आणि “पिंजरा” या मराठी चित्रपटांमधील भूमिकांसाठी त्या प्रसिद्ध होत्या. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजलेले नाही. ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. […]
लहान मुलांसाठी कफ सिरपच्या वापरासंबंधी केंद्र सरकारची नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी
लहान मुलांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी कफ सिरप आणि सर्दीवरील औषधांच्या वापराबाबत महत्त्वपूर्ण नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या सूचनांनुसार, बालरोग तज्ज्ञ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लहान मुलांना ही औषधे देताना विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मंत्रालयाने स्पष्ट केले […]
चिकनगुनियाचा धोका: दरवर्षी भारतातील ५.१ दशलक्ष लोकांवर संसर्गाची शक्यता, जागतिक अभ्यासातून उघड
भारताला चिकनगुनियाचा सर्वात मोठा दीर्घकालीन परिणाम सहन करावा लागू शकतो, दरवर्षी ५.१ दशलक्ष लोकांना या डासांमुळे होणाऱ्या संसर्गाचा धोका असतो. बीएमजे ग्लोबल हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या जागतिक अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. या आजारामुळे आरोग्य सेवा प्रणाली आणि व्यक्तींवर होणाऱ्या जागतिक परिणामांपैकी भारत आणि ब्राझीलचा वाटा ४८ टक्के आहे. […]
Blood Group Stroke Risk | नवीन संशोधनाचा धक्कादायक निष्कर्ष! ‘या’ रक्तगटाच्या लोकांना स्ट्रोकचा सर्वाधिक धोका
Blood Group Stroke Risk | पूर्वी स्ट्रोक (Brain Stroke) हा केवळ वाढत्या वयातील लोकांमध्ये आढळणारा आजार मानला जात होता. मात्र, बदललेली जीवनशैली आणि तणावामुळे आता तरुण आणि मध्यमवयीन लोकांनाही स्ट्रोकचा धोका वाढला आहे. याच अनुषंगाने, एका नवीन आंतरराष्ट्रीय रिसर्चमध्ये एक धक्कादायक खुलासा झाला आहे. तुमचा रक्तगट (Blood Group) काय आहे, […]
दहशतवादाला पाठिंबा थांबवा नाहीतर नकाशावरून पुसून टाकू — लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला इशारा
भारताने पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवावे किंवा त्याचे भौगोलिक अस्तित्व गमावावे असा कडक इशारा दिला आहे. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले की जर पाकिस्तानला नकाशावर आपले स्थान टिकवायचे असेल तर त्यांनी राज्य पुरस्कृत दहशतवाद संपवावा. राजस्थानमधील अनुपगढ येथे बोलताना जनरल द्विवेदी म्हणाले, “भारत एक देश म्हणून पूर्णपणे तयार आहे. यावेळी […]
विजयादशमी भाषणात मोहन भागवतांचे सुरक्षेपासून अर्थव्यवस्थेपर्यंत विविध मुद्द्यांवर भाष्य
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) शताब्दीनिमित्त विजयादशमी समारंभात, आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी देशासमोरील आव्हाने आणि भविष्यातील दिशा यावर आपले विचार मांडले. त्यांनी सांगितले की हा प्रसंग केवळ उत्सव साजरा करण्यासाठी नाही तर आत्मपरीक्षणासाठी देखील आहे. काश्मीर हल्ला आणि आंतरराष्ट्रीय पाठिंबा भागवत यांनी आपल्या भाषणाची सुरुवात जम्मू आणि काश्मीरमधील […]