नागपूर : विदर्भात विविध उद्योग समूह आकारास येत आहेत या उद्योग समूहांना आवश्यक असलेले तंत्र कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात लागणार आहे. भविष्यातील रोजगाराची ही संधी लक्षात घेता स्थानिक युवकांना विविध कौशल्य देणाऱ्या विद्यापीठाची आवश्यकता होती यासाठी साकारणाऱ्या विदर्भ ग्लोबल स्किल युनिव्हर्सिटीसाठी शंभर एकर जागा उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा […]
Category: बातमी
Near Death Experience | मृत्यूच्याक्षणी डोळ्यांसमोर येतो स्वतःचा जीवनपट !
संशोधनातून उघड झाले सत्य मृत्यूवेळी अनेकांसमोर आपलाच जीवनपट एखाद्या चित्रपटातील फ्लॅशबॅकप्रमाणे समोर उभा राहतो, असे म्हटले जाते. आता विज्ञानानेही या मुद्याला अधोरेखित केले आहे. मृत्यूवेळी माणसाच्या मेंदूत काय हालचाली घडतात, याबाबत अनेक दशकांपासून संशोधन सुरू आहे. आता प्रथमच एका मानवी मेंदूमधील मृत्यूच्या वेळेच्या हालचालींना रेकॉर्ड करण्यात यश आले आहे. त्यामधून […]
उद्योगांना त्रास देणाऱ्या आणि ब्लॅकमेल करणाऱ्यांविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचे निर्देश
उद्योगांना त्रास देणाऱ्या आणि ब्लॅकमेल करणाऱ्यांविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी पोलिसांना दिले आहेत. पिंपरी चिंचवड इथं पोलीस आयुक्तालय इमारतीच्या पायाभरणी समारंभात ते आज बोलत होते. राज्यातली होऊ पाहणारी जागतिक गुंतवणूक लक्षात घेता उद्योगांसाठी अनुकूल वातावरण तयार करणं आवश्यक असल्याचं फडनवीस म्हणाले. उद्योगांना त्रास दिल्याच्या, खंडणीची […]
Sirsoli battlefield | सिरसोली युद्धभूमीला डॉ. रघुवीर देशपांडे यांची भेट
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील सिरसोली गावातील युद्धभूमीला अकोल्याचे समाजसेवक डॉ. रघुवीर देशपांडे यांनी दिनांक 6/2/25 रोजी भेट दिली. 1803 साली ब्रिटिश आर्मी व मराठा सेना यांचे भीषण युद्ध सिरसोलीच्या जंगलात झाले. या युद्धात दोन्ही बाजूचे 50,000 सैन्य सहभागी होते. युद्धात 500 ब्रिटिश अधिकारी मराठा सेनेने कापून काढले.भीषण युद्धाचे शेवटी […]
Digitization of books | १०० वर्षे जुनी पुस्तके होणार डिजिटल
• ‘ग्रंथ संजीवनी’ पोर्टलवर सर्व डिजिटल पुस्तके उपलब्ध आहेत. पुणे : महाराष्ट्रातील ग्रंथालयांमध्ये दुर्मीळ पुस्तकांचा मोठा खजिना आहे. काही पुस्तके शंभर वर्षे जुनी आहेत, तर काही ८० वर्षे. हाच पुस्तकांचा खजिना योग्य पद्धतीने पुढील पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी राज्य सरकारच्या ग्रंथालय संचालनालयामार्फत राज्यभरातील १३५ सरकारमान्य शतायु ग्रंथालयांमधील दुर्मीळ पुस्तकांच्या डिजिटायझेशनचे काम […]
Rathasaptami | रथसप्तमी व्रतपूजन / सप्तमीचे महत्व
मराठी महिन्यांमध्ये माघ महिन्याला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. महिन्यात अनेक व्रत-वैकल्ये, सण-उत्सव येतात. भारतीय संस्कृतीतील व्रते, परंपरा यांचे केवळ अध्यात्मिक किंवा सांस्कृतिक एवढे मर्यादित महत्त्व नसून, ते आरोग्यदायी आणि विविध प्रकारच्या समृद्धीचे कारकही आहेत. वैज्ञानिकदृष्ट्याही सण-उत्सव, व्रत-वैकल्यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला सूर्य पूजन करण्याची प्रथा […]
Kisan Credit Card |किसान क्रेडिट कार्डची मर्यादा आता ५ लाख
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष २०२५ -२०२६ साठीचा अर्थसंकल्प मांडला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेची मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. पूर्वी ही मर्यादा फक्त ३ लाख रुपये होती. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात मांडलेल्या किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या निर्णयामुळे […]
शिवछत्रपतींची शिवछत्रपती आणि नेपाळ !
छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता म्हणजे श्रीतुळजाभवानी आणि महाराजांची आई भवानीवर नितांत भक्ती होती. भोसलेकुळाचे वर्णन करणारा ग्रंथ ‘बाबाजीवंशवर्णनम्’ यात उल्लेख आहे तो असा- श्रीमद्भोसलवंशोयं नेतरस्तु ममैव सः । सुर्यनारायणस्यायं श्रीमान वंशो महाद्युति । श्रीमान शंभूमहादेवः सर्वानंदप्रदायकः । भवानी चंडमुंडादिमहिषासुरमर्दिनी । कुलदैवतमेतस्य वंशस्य समुदीरितम् । म्हणजे भगवान विष्णू कथन करत आहेत […]
दुसऱ्या रक्तगटाचे रक्त देण्यात आले तर काय होईल ?
जेव्हा एखाद्या व्यक्तीला रक्ताची गरज भासते तेव्हा त्याला त्याच्याच रक्तगटाचे रक्त दिले जाते; पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, चुकून एखाद्याला त्याच्या रक्तगटाऐवजी दुसऱ्या रक्तगटाचे रक्त देण्यात आले तर काय होईल ? रक्त हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ते शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यात ऑक्सिजन आणि पोषक तत्त्वे […]
मोरोक्को मारणार ३० लाख भटके श्वान
फिफा २०३० विश्वचषकाचे मोरोक्को, स्पेन आणि पोर्तुगालमध्ये संयुक्त आयोजन करण्यात येणार आहे. फुटबॉलच्या या महाकुंभसाठी जगभरातून लाखो फुटबॉलप्रेमी येतील. अशा परिस्थितीत, देशाला स्वच्छ आणि आकर्षक बनवण्यासाठी, मोरोक्को काही क्रूर पावले उचलत असून, त्याबद्दल त्याच्यावर चौफेर टीका होत आहे. एका वृत्तानुसार, २०३० च्या फिफा विश्वचषकापूर्वी मोरोक्कोने किमान ३० लाख भटक्या कुत्र्यांना […]