महाराष्ट्रातील भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना नांदेड जिल्ह्यातील होट्टल गावातील पौराणिक मंदिरांच्या उत्खननादरम्यान शिव मंदिराशी संबंधित शिलालेख सापडले आहेत. या काळात एका पौराणिक शिवमंदिराचा पाया आणि तीन शिलालेख आढळले आहेत. चालुक्य वंशाच्या राजांनी अकराव्या शतकात नांदेडच्या होट्टल गावात अनेक मंदिरे बांधली होती, असे म्हणतात. नांदेड जिल्ह्यातील होट्टल येथे उत्खननात सापडलेल्या मंदिराचा […]
Category: बातमी
फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची अप्रकाशित बखर!
पॅरीस : फ्रान्समध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जुनी, अप्रकाशित अशी प्राचीन बखर सापडली आहे. ही बखर मोडी लिपीत आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा प्रारंभ आहे. पुण्यातील दोन संशोधकांना फ्रान्समधील ‘नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्स’मध्ये ही बखर सापडली आहे. त्यामुळे या बखरीतून शिवचरित्रातील अनेक नव्या पैलूंचा […]
“गप्पी माशे पाळा हिवताप टाळा’ कोणताही ताप असू शकतो हिवताप
पुढील काळात पावसाळा सुरू होणार आहे. हा काळ कीटकजन्य रोगांच्या प्रसारास अनुकूल असून मुख्यतः याच काळात कीटकजन्य आजार जसे हिवताप, डेंग्यूताप व चिकुनगुन्या ताप इत्यादी या आजारांचा प्रसार वाढतो. या रोगांचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येतात. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जनतेमध्ये हिवताप कार्यक्रमाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी […]
गौतम बुद्ध : समाजक्रांतीचे प्रणेते
भारतवर्षामध्ये ज्ञानक्रांती घडवून आणणारा ऋषितुल्य तपस्वी म्हणून भगवान गौतम बुद्धांचे जीवनकार्य अजरामर ठरले आहे. पौर्णिमेच्या दिवशी जन्म, महानिर्वाण आणि केवळ ज्ञानप्राप्ती हा अद्भुत योग या महामानवाच्या जीवनात घडून आला. भगवान बुद्धांनी दिव्यज्ञानाने सबंध जगाला प्रकाशमान करून टाकले आणि भारतमातेचा हा सुपुत्र सामाजिक न्याय आणि समाजक्रांतीचा उद्गाता ठरला. आज (२३ मे) […]
जाणून घ्या, ग्रीन टी विषयी…
ग्रीन टी हा पोषक घटकांचा खजिना मानला जातो. म्हणूनच बहुतेक आरोग्यतज्ज्ञ ते पिण्याची शिफारस करतात. मात्र, ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ माहीत असणे आवश्यक आहे; अन्यथा आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. याबाबतची ही तज्ज्ञांनी दिलेली माहिती… ग्रीन टी पिण्याचे लाभ : कर्करोग प्रतिबंध : कॅन्सर हा एक अत्यंत गंभीर आजार आहे. […]
धन की बात !
एप्रिल महिना लागला की पहिल्या दिवशी काहीतरी लोणकढी थापा मारून मित्रांना फसवणे आणि दुरून त्यांची फजिती पाहणे यात असुरी नाही पण बालसुलभ आनंद असायचा. त्या थापा सुचणे आणि निरागस भाबडा भाव चेहऱ्यावर ठेवून मित्राला सांगणे ही अभिनयाची प्राथमिक कार्यशाळा असायची तेव्हा! आज अमुक सर सिनेमाचे, सर्कसचे पास देणार आहेत किंवा […]
त्वचाविकार – खरूज कारण आणि उपचार
मानवी शरीर हे अत्यंत संवेदनशील आहे. आपल्या याच शरीराचं संरक्षण आपली त्वचा करत असते . अनेक प्रकारच्या विषाणूजन्य, जिवाणूजन्य आणि बुरशीजन्य आजारापासून संरक्षण देणारे संरक्षक कवच म्हणजे आपली त्वचा असते परंतु अनेकदा अस्वच्छतेमुळे काही विशिष्ट प्रकारच्या विषाणूंचे आपल्या बाह्य त्वचेवर आक्रमण होते आणि आपल्याला त्वचेचे विकार होतात. शारीरिक अस्वच्छतेमुळे बहुतांशी […]
काश्मीरमधील प्राचीन मार्तंड सूर्यमंदिराचा होणार जीर्णोद्धार
जम्मू काश्मीर येथील आनंतनाग जिल्ह्यातील 8 व्या शतकातील मार्तंड सूर्यमंदिराचा जीर्णोद्धार आणि संवर्धन करण्यात येणार आहे. हे मंदिर भारतातील सर्वांत जुने सूर्यमंदिर आहे. सम्राट ललितादित्य मुक्तपाद यांनी हे मंदिर उभारले होते. त्यानंतर मध्य युगात मुस्लिम शासक सुलतान सिंकदर शहा मिर याच्या आदेशावरून हे मंदिर उद्धवस्त करण्यात आले होते. या मंदिराचे […]
वऱ्हाडी कथा : पंगत
संज्या हा आकोला जिल्ह्यातल्या माना या गावाचा. एक वलीतातला सधनं कास्तकार म्हनूनसन्या गावात त्याची ओयख. त्याचं मॅट्रीक लोग मान्यातचं शिक्षण होयेलं राह्यते.अन बारावी लोग तालुका मुर्चापूरले. त्याले नवकरी करनं आवळतं नसल्यानं . थो बारावी नंतर शिक्षण सोळूनं देते .अन वावराकळे लक्ष द्याले लागते. त्याची दा एक्कर जमीनं वलीता खालची असते. […]
लोकांचा शिक्षणापेक्षा पान, तंबाखू, मादक पदार्थांवर जास्त खर्च
गेल्या दहा वर्षांत पान, तंबाखू आणि इतर मादक पदार्थांचे सेवन वाढले आहे आणि लोक त्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा अशा उत्पादनांवर खर्च करत असल्याचे एका सरकारी सर्वेक्षणातून समोर आले आहे. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांत एकूण घरगुती खर्चापैकी पान, तंबाखू आणि मादक पदार्थांवर होणाऱ्या खर्चात वाढ झाल्याचे कौटुंबिक उपभोग खर्च […]