टीआरएआयचे आदेश प्रत्येक स्मार्टफोनमध्ये असणार सुविधा मुंबई : प्रत्येक फोनधारकाला कोणाचा फोन आला, याची माहिती समजणे आवश्यक आहे. एखाद्याचा नंबर मोबाईलमध्ये नसला तरी त्याची माहिती समजली पाहिजे, अशी सुविधा प्रत्येक स्मार्टफोनमध्ये सुरू करावी, असा आदेश टेलिकम्युनिकेशन रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडियाने (टीआरएआय) दिला आहे. कॉलिंग नेम प्रेसेंटेशन (सीएनपीए) अर्थात फोन करणाऱ्याचे […]
Category: बातमी
आरोग्यासाठी लाभ असतात आंबवलेले पदार्थ
Fermented Food Benefits फर्मेंटेड फूड म्हणजेच आंबवलेले पदार्थ. इडली, डोसा हे पदार्थ तयार करताना सर्वात आधी त्याचे पीठ आंबवले जाते. आंबवलेले पदार्थ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. आंबवण्याच्या प्रक्रियेत बॅक्टेरिया आणि यीस्टसारखे सूक्ष्मजीव स्टार्च आणि साखर सारख्या कर्बोदकांमधे अल्कोहोल किंवा अॅसिडमध्ये रूपांतरित करतात. त्यामुळे जास्त प्रमाणात आंबवलेल्या पदार्थांची चवदेखील थोडी आंबट […]
औषधे, सौंदर्यप्रसाधने, मिठाई बनविण्यासाठी चीनमध्ये दररोज हजारो गाढवांची कत्तल
गाढव वाचविण्यासाठी आफ्रिकन युनियनने घातली निर्यातीवर बंदी गाढवीणीच्या दुधाला आयुर्वेदात औषध म्हणून फार महत्त्व आहे. या प्राण्याकडे आता चीनची नजर गेली आहे. पारंपरिक औषधे, सौंदर्यप्रसाधने आणि लोकप्रिय मिठाई बनविण्यासाठी चीनमध्ये आफ्रिकेतून आयात केलेल्या हजारो गाढवांची रोज कत्तल सुरू आहे. यामुळे आफ्रिकेतील जनतेचे वस्तू वाहनाचे साधन कालबाह्य ठरण्याचा धोका निर्माण झाला […]
कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रातल्या समस्या सोडवण्यासाठी ११ सदस्यांची समिती
कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रातल्या समस्या सोडवण्यासाठी शासन वचनबद्ध असून त्याकरता ११ सदस्यांची समिती नियुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. शतकमहोत्सवी अखिलभारतीय नाट्यसंमेलना अंतर्गत महाबळेश्वर इथं आयोजित संमेलनाचं उद्घाटन 24 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. नाट्य संस्कृतीला बळ देण्यासाठी राज्यातल्या ५२ नाट्यगृहांचं अद्ययावतीकरण करणार […]
नखांमधील बुरशीजन्य संसर्ग
nail Fungal ‘नेल फंगस’ची समस्या मूलतः अस्वच्छता, नखांची सफाई न करणे, प्रदूषण आणि पायांना दीर्घकाळ घाम आल्यामुळे उद्भवते. याखेरीज ज्या लोकांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते, त्यांच्या नखांमध्येही नेहमी संसर्ग होतो. नखांमधील संसर्ग बहुतांशवेळा बुरशीजन्य असतो. यात सर्वाधिक दिसणारा संसर्ग एका विशिष्ट प्रकारच्या बुरशीतून होतो. तिला डर्माटोफाइट असे म्हणतात. यीस्ट आणि […]
अस्थिमज्जा प्रत्यारोपणाचे फायदे आणि तोटे
अस्थिमज्जा प्रत्यारोपण (बोन मॅरो ट्रान्सप्लांट) ज्याला हेमॅटोपोएटिक स्टेम सेल प्रत्यारोपण असेही म्हणतात, ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे जी अनेक दुर्धर आजारी लोकांचे प्राण वाचवू शकते. तथापि अनेक वैद्यकीय उपचारांप्रमाणे त्याचे फायदे आणि तोटेही आहेत. संसर्गाचाही धोका : बोन मॅरो ट्रान्सप्लांटमध्ये संसर्ग होण्याचा धोका देखील असतो, कारण या प्रक्रियेत | रोगप्रतिकारक […]
टायफॉईडची लस तयार
मुंबई : दरवर्षी साधारणतः सव्वा लाख मुलांचे प्राण घेणाऱ्या टायफॉईड म्हणजेच तापावर भारत बायोटेकने तयार केलेली लस परिणामकारक ठरली आहे. भारत बायोटेकच्या ‘टाईपबार’ या लसीमुळे किमान चार ते साडेचार वर्षांपर्यंत ताप येणार नसल्याचे निष्कर्ष तिसऱ्या टप्प्यातल्या चाचणीतून काढण्यात आले. ही चाचणी आफ्रिकेतल्या मलावी या देशात पार पडली. धोकादायक आजारांपैकी एक […]
१ जुलैपासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता, आणि भारतीय साक्ष अधिनियम, हे नवीन कायदे येत्या १ जुलैपासून लागू होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानं आज यासंदर्भातली राजपत्रित अधिसूचना जारी केली. गेल्या डिसेंबरमधे संसदेत ही तीनही फौजदारी न्याय विधेयकं मंजूर झाली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत भारतीय न्याय संहिता (द्वितीय सुधारणा) […]
प्रेमाचा ‘केमिकल लोचा’ !
प्रेमाला उपमा नाही, ते देवाघरचे देणे,प्रेम या अडीच अक्षरी शब्दात किती ताकद आहे म्हणून सांगू? प्रेमाच्या प्रभावाखाली आल्यावर तर भले विद्वान, शहाणी माणसं शरणागती पत्करतात. राजे- महाराजांच्या ‘तख्तों- ताज’ ची उलथापालथ झाली, युद्ध होऊन रक्ताचे पाट वाहीले, असं आपला इतिहास सांगतो. प्रेम या भावनेला जीवशास्त्रीय, रासायनिक बाजूही असते. मेंदूतील अनेक […]
भारताने बुडवलेली पाकची ‘गाझी’ सापडली
विशाखापट्टणम : बांगला देश युद्धात भारताच्या आयएनएस विक्रांत बुडवण्याचे मिशन घेऊन आलेल्या, पण लढवय्या भारतीय नौसेनेच्या प्रत्युत्तरात समुद्रात बुडालेल्या पाकिस्तानच्या पीएनएस गाझी या पाणबुडीचे अवशेष शोधण्यात भारतीय नौदलाला यश आले आहे. विशाखापट्टणमच्या समुद्रात ३ कि.मी. अंतरावर १०० मीटरपेक्षा अधिक खोल तळाशी पाकिस्तानची गाझी ही पाणबुडी चिरविश्रांती घेत आहे. डीप सबमर्जन्स […]