रविवार १४ सप्टेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे वतीने शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या काही निवडक शिक्षकांच्या गौरवार्थ कृतिशील शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन आर.एल. टी. विज्ञान महाविद्यालयाचे सभागृहात पार पाडले. #Dr. Ranjit_Patil
पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटक म्हणून माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री डॉ रणजीत पाटील हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी ॲड. मोतिसिंहजी मोहता, अध्यक्ष बि जि ई सोसायटी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार वसंतराव खोटरे, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक मा. रतनसिंग पवार, डॉ. अपर्णाताई पाटील,मा. पवनजी माहेश्वरी मानद सचिव बिजीई सोसायटी अकोला, मा. डॉ. नरेश बजाज, संजय चौधरी, ॲड.गिरीश गोखले, संजय तिकांडे, आशिष पवित्रकार, डॉ अरविंद लांडे परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष प्रकाश चतरकर, रविकुमार खेतकर ,साबीर कमाल,यांचेसह जिल्ह्यातील प्राथ, माध्य, उच्च माध्यमिक व मुख्याध्यापक शिक्षक संघटना आदि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
‘आचार्य देवो भव’ ही भावना केवळ आमच्याच काळजात कोरली गेली आहे असे नव्हे, तर भारतवर्षात महान गुरू- शिष्य परंपरा रूजलेलीआहे. विश्वातील प्रत्येक व्यक्तीचे मन गुरुंप्रती परम आदराने व्यापलेले आहे. जागतिक कल्याण, प्रगती व सर्व क्षेत्रातील उत्थानात शिक्षकांचे योगदान हे अमुल्य आहे. त्यांच्या कठोर परिश्रम, समर्पण आणि ज्ञानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते शिक्षकांच्या या ऋणातून उतराई होण्यासाठी अश्या कार्यक्रमांची आवश्यकता आहे असे प्रतिपादन डॉ. रणजीत पाटील यांनी उद्घाटक म्हणून बोलतांना केले शिवाय २०१३ आधीच्या शिक्षकांना टीईटी लागू होऊ देणार नाही याकरीता कोणत्याही स्तरावर संघर्ष करण्यासाठी मी बांधील आहे अशी ग्वाही सुध्दा त्यांनी दिली.

या सोहळ्यात अकोला जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या निवडक (केजी टू पिजी) शिक्षकांचा यामधे कॉन्व्हेंट स्कूल, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालय तसेच आश्रम शाळांमधील एकुण ७५ शिक्षकांचा कृतिशिल शिक्षक पुरस्कार देउन गौरव करण्यात आला.
शिक्षक दिनाचे औचित्य साधुन गुरूंना वंदन म्हणून जिल्हातील सर्व प्राथमिक तथा माध्यमिक शिक्षक! संघटनाच्या जिल्हाध्यक्षांचे स्वागत स्वत: डॉ. रणजीत पाटील यांनी पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन केले. तसेच शिक्षण क्षेत्रात आपल्या अध्यापनासोबतच संघटनात्मक कार्यातील अविरत योगदानासाठी विजुक्टाचे प्रांताध्यक्ष प्रा.अविनाश बोर्डे व शिक्षक परिषदेचे जेष्ठ मार्गदर्शक श्री.संतोषराव इंगळे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेसर असलेल्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळंदा ता. बार्शिटाकळी व जिल्हा परिषद प्राथमिक उर्दु शाळा दहिहांडा ता. अकोला अश्या दोन शाळांचा “कृतिशील शाळा” पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
तसेच अध्यापनाच्या कार्यासोबतच उल्लेखनिय शैक्षणिक, सामाजिक कार्य करणार्या डॉ.राजेश चंद्रवंशी, श्री.संतोष झामरे, श्री.किशोर चतरकर, श्री.प्रशांत अंभोरे, या चार शिक्षकांना “शिक्षक रत्न” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सचिन काठोळे यांनी तर आभार कार्यवाह विजय वाकोडे यांनी मानले. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन दिगंबर खडसे व देवेंद्र वाकचवरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी अतुल पिलात्रे, संतोष झामरे, किशोर चतरकर, मोहम्मद वसिमोद्दीन,दत्तात्रय सोनोने, वंदना बोर्डे, रूजिता खेतकर, गजानन शेवलकर, संतोष वाघमारे, चंद्रशेखर पेठे, नितीन बंडावार, सुनिल माणिकराव, धर्मेंद्र चव्हाण, रामभाऊ मालोकार, अरूण वाघमारे, संतोषराव इंगळे, राजेश मसने,रूपेश सुर्यवंशी , विजय धनाडे, मंगेश पेशकर, एहसान पठाण, दिनेश भटकर, श्याम कुलट, संतोष रा. इंगळे, मनोज वाडकर,अनिल भाकरे, प्रशांत पुराणीक, सुभाष जोगदंड, रविंद्र आवारे, बिपिन कुरई,अंजली मानकर, सुनिता कोथळकर, सुरेखा जोशी, सरिता सोळंके , कुमुद अंबाळकर, रघुनाथ चव्हाण, गजानन गोतरकर, अनंत मिसाळ, अतुल गावंडे , विनोद शिवरकर, हर्षल दोड, राहूल अडगावकर, प्रशांत देशमुख, सतिष खंडारे, निलिमा दांदळे, शिवशंकर अस्वार ,अमोल सराफ, विष्णू झामरे,अश्विन हिंगणकर, अमोल कावरे, अमित सुरपाटने ,अरूण भराडी, निलेश शेगोकार, प्रशांत कठाळकर, रामधन घोगरे, प्रकाश साबळे, गोपाल महल्ले, नरेंद्र इंगळे,अजय शितोळे, राजेश ढोरे, संदीप महल्ले, निलेश धांडे , श्याम हिंगनकर, विठ्ठल वानखडे, धनंजय मंगळे, नामदेव देवकते, ज्ञानदीप मानकर, योगीता शर्मा, प्रिती वाघमारे, इत्यादींनी परिश्रम घेतले.