अकोला : मराठा सेवा संघाच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त अकोला जिल्हा मराठा मंडळ येथे आयोजित स्नेहमिलन मेळावा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा मराठा सेवा संघ कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
या सोहळ्यात स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायजेशन चे अध्यक्ष, राष्ट्रीय व्याख्याते प्रा. राजेश पाटिल ताले यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कार्यगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.# Swami_Vivekananda Group of Organization

प्रा. राजेश पाटिल ताले हे मागील ११ वर्षांपासून वाचन संस्कृतीचे संवर्धन व प्रचार-प्रसार,महाराष्ट्रभर व्याख्याने/कार्यशाळा/शिबिरांच्या माध्यमातून वैचारिक प्रबोधन,गाव तिथं वाचनालय आणि शाळा तिथं ग्रंथालय या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी,माझोड- पुस्तकांचे गाव ही संकल्पना राबविण्यात येत आहे अशा विविध उपक्रमांद्वारे समाजासाठी मोलाचे कार्य करीत आहेत.या सर्व कार्याची दखल घेऊन मराठा सेवा संघ कार्यगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला आहे.मराठा सेवा संघ गेल्या ३५ वर्षांपासून समाजाच्या सर्वांगिण उन्नतीसाठी परिवर्तनवादी, प्रगतशील आणि सकारात्मक कार्य करीत आहे. समाजाच्या हितासाठी विविध ३३ कक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देश पातळीवर कार्यरत आहे. या ३५ वर्षात मराठा सेवा संघाने अनेक ऐतिहासिक उपक्रम राबविले आहेत. दि. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी मराठा सेवा संघाचा ३६ वा स्थापणा दिवस साजरा करण्यात आला.