अत्तराचाही एक वेगळा इतिहास आहे. अत्तराच्या मनमोहक सुगंधाची गोष्ट भरपूर रंजक माहितीने भरलेली आहे. अत्तराच्या सुगंधाने माणूस मुग्ध होत असतो. आज सुगंध हा श्रीमंतांचा शौक तर झाला आहेच पण मध्यम व कनिष्ठ वर्गही याकडे खूपच आकर्षित आहे. अत्तराचा वापर वैदिक काळापासून सुरू झाला होता. एखाद्या व्यक्तीच्या हाताला एखाद्या हरणाच्या नाभीतून […]
दही कसं तयार होतं?
कोणत्याही गृहिणीला विचारा. ती म्हणेल,’इश्श! त्यात काय आहे? दुधात इवलंसं विरजण घाला आणि झाकून ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी ठेवलंत तर सकाळी उठाल तेव्हा दही तयार झालेलं असंल.’ खरं आहे. पण मग दिल्लीसारख्या उत्तरेकडच्या शहरात हिवाळ्यात तसं करुनही दही का लागत नाही? आणि विरजण म्हणजे तरी काय? ते दुधात घातल्यावर नेमकं काय […]
जुने मतदार ओळखपत्र असल्यास नव्याने काढा!
अकोला : कोणत्याही निवडणुकीत मतदान करायचे असल्यास मतदाराजवळ मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे, परंतु अनेक मतदारांकडील मतदार ओळखपत्र जुने झाले आहे. त्यामुळे त्या ओळखपत्रावरील छायाचित्र, नाव, पत्ता ओळखणे अशक्य होत असल्याने, संबंधित मतदारांनी नव्याने ओळखपत्र काढून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. नाव नोंदवायचे असेल […]
आम आदमी पार्टी विधानसभेच्या पाचही जागा लढणार
जिल्हा संयोजक यांची पत्रकार परिषदेत माहिती अकोला : जिल्ह्यातील पाचही विधानसभेच्या जागावर आम आदमी पाटी आपले स्वतंत्र उमेदवार उभे करणार असल्याची माहिती जिल्हा संयोजक कैलाश प्राणजळे महानगर अध्यक्ष अलहाज मसूद अहेमद यांनी शुक्रवार ता. २ ऑगस्ट रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. देशात पंजाब व दिल्ली या राज्यात जनतेने आम आदमी […]
शिवरायांची जयंती आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-खास’मध्ये दरवर्षी होणार !
आग्रा येथील दिवाण-ए-खासमध्ये महाराजांची शिवजयंती साजरी करण्यासाठी दरवर्षी परवानगी घेण्याची गरज पडू नये, यासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाने राज्य सरकारसोबत एक सामंजस्य करार करावा, असा प्रस्ताव राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला होता. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. छत्रपती शिवाजी […]
मिटकरी गाडी हल्ला प्रकरण : मुख्य सूत्रधार दुनबळे अद्याप फरार अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव
अकोला : अकोला येथील शासकीय विश्रामगृहाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केल्या प्रकरणी मनसेचे 5 कार्यकर्ते अटकेत आहेत. तर जवळपास 20 कार्यकत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेत असलेल्या सचिन गालट, ललित यावलकर, अरविंद शुक्ला मुकेश धोंडफळे आणि रुपेश तायडे या 5 जणांच्या जामिनावर […]
९८ वे साहित्य संमेलन नवी दिल्लीत?
अ. भा. मराठी साहित्य महामंडळ निवड समितीकडून स्थळाची पाहणी नवी दिल्ली: अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९८ व्या मराठी संमेलनासाठी स्थळ निवड समितीने गुरुवार, १ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथील नियोजित स्थळाची पाहणी केली. देशाची राजधानी नवी दिल्ली येथील सरहद्द संस्थेतर्फे संमेलनासाठी निमंत्रण आल्याने महामंडळ सदस्यांनी इचलकरंजी येथे भेट दिल्यानंतर […]
अन्नधान्यातील भेसळ शोधण्यासाठी पतंजलीचे नवीन संशोधन
देशात सध्या अन्नधान्य भेसळ हे एक गंभीर आव्हान आहे आणि आज त्याचे भयंकर परिणाम म्हणून अनेक रोग सर्वांसमोर आहेत. पतंजलीने देशातील अन्नधान्यांमधील कीटकनाशके आणि रसायने शोधण्यासाठी एक नवीन संशोधन केले आहे, जे प्रसिद्ध ‘मायक्रोकेमिकल जर्नल’ने प्रकाशित केले आहे. पतंजलीचे आचार्य बाळकृष्ण म्हणाले की, या संशोधनाच्या माध्यमातून लोक आता अन्नाच्या गुणवत्तेचे […]
विरंगुळा केंद्रासाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार प्रकाश भारसाकळे
अकोली (जहागीर) ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्रासाठी निधी कमी पडू देणार नाही असे उद्गार प्रकाश भारसाकळे आमदार आकोट विधानसभा यांनी अकोली जहागीर येथे ग्रामीण ज्येष्ठ नागरिक संघाचे आमसभेत काढलेत पुढे बोलतांना त्यांनी ज्येष्ठ नागरिक हा अनुभवाचा आरसा असून त्यांचा समाजात यथोचित सन्मान व्हायला हवा असे सांगितले सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम […]
श्रीमती सूमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय शिर्ला (अंधारे) येथे वसंतराव नाईक जयंती आणि कृषी दिन साजरा.
श्री दत्तात्रय शिक्षण प्रसारक मंडळ, अकोला द्वारा संचलित श्रीमती सूमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय शिर्ला (अंधारे) येथे हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यी जयंती आणि कृषी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेच्या सचिव सौ हेमलता ताई अंधारे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले,यावेळी […]