” काय श्यामराव कवा चारता पोरीच्या लगनाचा बुंदा. “” साजरा सोयराच मनाजोगता भेटूनं नाह्यी राह्यला ना बावा डिग्या. “” कसा पायजे. “” दनकट कास्तकार पायजे ब्वा. “” मंग जितापूरले हाय एक सोयरा. पन्नासक एक्कर वावर हाय. “” पोरगं काय करते. “” कास्तकारी… दुसरं काय करनं भोकाचे वळे काहाळनं काय. इतल […]
एक टॅबलेट, दोन कार्ये!
प्रतिकारशक्ती वाढवून रेडिओथेरपीचे दुष्परिणाम होणार कमी रेडिओथेरपीनंतर या रुग्णांना होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी ॲक्टोसाइट नावाचे औषध विकसित केले गेले आहे. हे औषध अणुऊर्जा विभाग (डीएई), भाभा अणु संशोधन केंद्र (बीएआरसी) आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयडीआरएस लॅबने विकसित केले आहे. तथापि, या औषधाची फेज-२ क्लिनिकल चाचणी टाटा मेमोरियल […]
किल्ल्यात सापडले महाभारतकालीन अवशेष!
दिल्लीतील पुराना किल्ला भागात करण्यात आलेल्या उत्खननामधून मातीच्या वस्तूंचे अवशेष सापडले आहेत. पुरातत्त्व विभागाच्या माहितीनुसार, पा अवशेषांशी संबंधित माहिती पाहिली असता, ती महाभारत काळातील असल्याचे सांगण्यात आले. भारतात धार्मिक आणि अध्यात्मिक ग्रंथ आणि त्या अवतीभोवती फिरणारे अनेक संदर्भ सातत्याने पाहायला मिळतात. अशा या ग्रंथ आणि यादीत येणारे एक महत्त्वाचे नाव […]
नांदेड जिल्हयात आढळले अकराव्या शतकातील शिवमंदिर
महाराष्ट्रातील भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना नांदेड जिल्ह्यातील होट्टल गावातील पौराणिक मंदिरांच्या उत्खननादरम्यान शिव मंदिराशी संबंधित शिलालेख सापडले आहेत. या काळात एका पौराणिक शिवमंदिराचा पाया आणि तीन शिलालेख आढळले आहेत. चालुक्य वंशाच्या राजांनी अकराव्या शतकात नांदेडच्या होट्टल गावात अनेक मंदिरे बांधली होती, असे म्हणतात. नांदेड जिल्ह्यातील होट्टल येथे उत्खननात सापडलेल्या मंदिराचा […]
फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची अप्रकाशित बखर!
पॅरीस : फ्रान्समध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जुनी, अप्रकाशित अशी प्राचीन बखर सापडली आहे. ही बखर मोडी लिपीत आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा प्रारंभ आहे. पुण्यातील दोन संशोधकांना फ्रान्समधील ‘नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्स’मध्ये ही बखर सापडली आहे. त्यामुळे या बखरीतून शिवचरित्रातील अनेक नव्या पैलूंचा […]
“गप्पी माशे पाळा हिवताप टाळा’ कोणताही ताप असू शकतो हिवताप
पुढील काळात पावसाळा सुरू होणार आहे. हा काळ कीटकजन्य रोगांच्या प्रसारास अनुकूल असून मुख्यतः याच काळात कीटकजन्य आजार जसे हिवताप, डेंग्यूताप व चिकुनगुन्या ताप इत्यादी या आजारांचा प्रसार वाढतो. या रोगांचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येतात. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जनतेमध्ये हिवताप कार्यक्रमाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी […]
कासव घरात फीशपॉटमध्ये ठेवणे कायद्याने गुन्हा!
कासव आणि ससा यांची कथा तुम्ही ऐकली असेलच. या कथेत कासव विजेता आणि ससा हरणारा आहे. वास्तविक कासव हे आपल्या परिसंस्थेसाठी खूप महत्वाचे आहे. या कारणास्तव दरवर्षी २३ मे रोजी जागतिक कासव दिन साजरा केला जातो. दिवसाची सुरुवात अमेरिकन कासव रेस्क्यूने केली होती. या दिवसाशी संबंधित सर्व महत्वाची माहिती सदर […]
गौतम बुद्ध : समाजक्रांतीचे प्रणेते
भारतवर्षामध्ये ज्ञानक्रांती घडवून आणणारा ऋषितुल्य तपस्वी म्हणून भगवान गौतम बुद्धांचे जीवनकार्य अजरामर ठरले आहे. पौर्णिमेच्या दिवशी जन्म, महानिर्वाण आणि केवळ ज्ञानप्राप्ती हा अद्भुत योग या महामानवाच्या जीवनात घडून आला. भगवान बुद्धांनी दिव्यज्ञानाने सबंध जगाला प्रकाशमान करून टाकले आणि भारतमातेचा हा सुपुत्र सामाजिक न्याय आणि समाजक्रांतीचा उद्गाता ठरला. आज (२३ मे) […]
जाणून घ्या, ग्रीन टी विषयी…
ग्रीन टी हा पोषक घटकांचा खजिना मानला जातो. म्हणूनच बहुतेक आरोग्यतज्ज्ञ ते पिण्याची शिफारस करतात. मात्र, ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ माहीत असणे आवश्यक आहे; अन्यथा आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. याबाबतची ही तज्ज्ञांनी दिलेली माहिती… ग्रीन टी पिण्याचे लाभ : कर्करोग प्रतिबंध : कॅन्सर हा एक अत्यंत गंभीर आजार आहे. […]
अडचणीतील बँका, पतसंस्था दलदलीतून बाहेर का निघत नाहीत?
पतसंस्था किंवा बँकिंग हे काळजीपूर्वक करायचे पूर्णवेळाचे काम आहे. राजकारण करता करता पतसंस्था चालवू म्हटले की, ठेवीदारांसह संचालक मंडळ बुडालेच ! अलीकडेच अहमदनगर जिल्ह्यातील सहकारी पतसंस्था चळवळीत दोन खळबळजनक घटना घडल्या. श्रीनाथ मल्टिस्टेट पतसंस्थेचे अध्यक्ष पोपटराव शेवाळे यांनी केलेली आत्महत्या आणि संपदा नागरी सहकारी पतसंस्थेचे तत्कालीन अध्यक्ष ज्ञानदेव वाफारे, त्यांचे […]