अकोला- लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या कोरोना काळात स्थापन झालेल्या व अल्पावधीतच नावलौकिक प्राप्त करणाऱ्या पत्रकारांच्या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेत अकोला येथील दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक ,एक आक्रमक शेतकरी नेते श्री. प्रकाशभाऊ पोहरे यांचा प्रवेश झाला आहे.ते इंडीयन लॕंग्वेजेस न्यूजपेपर्स असोसिएशन (ईलना) या देशभरातील सर्वभाषिक वृत्तपत्रांच्या संपादक प्रकाशकांच्या राष्ट्रीय संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारी […]
निद्रानाश !
कुंभकर्णाचा ब्रह्मदेवाला वर मागताना संभ्रम झाला. त्याने इंद्रासनाऐवजी निद्रासन मागितले आणि तो 6 महिने झोपून राहायचा. हल्ली आपली मात्र निद्रा नीट होत नाही, म्हणून दुसऱ्या दिवशी आपला गोंधळ उडतो, आपण संभ्रमात राहतो. जीवनातील एक तृतियांश वेळ झोपेत जाते. ती जीवनातील अती आवश्यक गरज आहे, पण बरेच लोक निद्रेला प्राधान्य देत […]
राज्यांतील अधिकाऱ्यांची विचारसरणी अजूनही लायसन्स राजसारखीच
मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांची खंत नवी दिल्ली : केंद्र सरकारने सुधारणा करूनही राज्यांतील अधिकारी अजूनही ‘परवाना आणि नियंत्रण राज’च्या काळात असल्यामुळे उत्पादन क्षेत्रात काम करूनही विकास दर वाढन्यामध्ये अडथळे येत असल्याची खंत देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी व्यक्त […]
आजारी पेन्शनधारकांच्या घरी जाऊन हयातीचा दाखला घ्या! बँकांना केंद्र सरकारचे निर्देश, डिजिटल दाखल्याबाबत जनजागृती करा
नवी दिल्ली: आजारी आणि रुग्णालयात दाखल असलेल्या निवृत्ती वेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी बँकांत बोलावण्याऐवजी बँकांनीच आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचावे, असे निर्देश केंद्र सरकारने पेन्शन वितरण करणाऱ्या सर्व बँकांना दिले आहेत. ८० वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या अतिज्येष्ठ पेन्शनधारकांना डिजिटल माध्यमातून हयातीचा दाखला सादर करण्यासंदर्भात जागृती करावी, असेही सरकारने बँकांना […]
मृत्यूपत्राचे महत्व !
कोरोना महामारीमध्ये मृत झालेल्या अनेक नागरिकांचा घरात प्रॉपर्टीवरून खूप वाद सुरू आहेत आणि अनेक प्रकरणे कोर्टातसुद्धा गेलेली आहेत, असा एक सर्वे नुकताच वाचण्यात आला. सीमा (नाव बदलेले) एक माझी अशील एकदा माझ्याकडे आली आणि म्हणाली की, मी माझ्या आईची गेल्या १० वर्षांपासून खूप सेवा केली, परंतु आईने तिच्या मृत्यूपत्रात मला […]
अणुबॉम्बच्या निर्मात्याची दुर्दैवी गोष्ट
ऑगस्ट १९४५. दुसरा आठवडा. या आठवड्यात घडलेल्या दोन घटनांनी जगाच्या इतिहासाचा चेहरामोहराच बदलून टाकला. या घटना घडल्या जपानमध्ये. पण त्याने आख्खं जग हादरून गेलं. या घटना म्हणजे हिरोशिमा आणि नागासाकीवर झालेला अणुबॉम्ब हल्ला. या हल्ल्यानंतर अमेरिकेचा महासत्ता बनण्याचा मार्ग आणखीनच सोप्पा झाला. अणुबॉम्बची ताकद आणि दहशत जगाला समजली. त्यानंतर आपल्याकडेही […]
चांद्रमोहिमेची गरुडझेप
चांद्रयान- ३ मोहिमेचा उद्देश मागच्या अभियानाप्रमाणेच चंद्रावरच्या वातावरणाचा अनुभव घेणे, तेथील भूकंपीय हालचालींचे आकलन करणे आणि संभाव्य खनिज पदार्थांचा शोध लावणे, हा आहे. भारताचा पुढील टप्पा मानव अभियानाचा आहे. यात आपण यशस्वी ठरलो तर देशाच्या अंतरिक्ष इतिहासात मैलाचा दगड ठरेल. आगामी काळात भारताला अंतरिक्ष मोहिमा वाढवाव्या लागतील. भारताने अधिकाधिक शिक्षण […]
रेल्वे स्थानकांवर पुन्हा मिळणार वर्तमानपत्रे!
रेल्वे बोर्डाचे सर्व स्थानकांना आदेश; इंडियन न्यूज पेपर सोसायटीच्या पाठपुराव्याला मोठे यश मुंबई : रेल्वेस्थानकांवरील सर्व स्टॉल्स व रेल्वे गाड्यांमध्ये वर्तमानपत्रे आणि नियतकालिके विक्रीसाठी ठेवण्याची परवानगी द्या, असे महत्त्वपूर्ण आदेश रेल्वे बोर्डाने भारतीय रेल्वेच्या सर्व स्थानक प्रमुखांना दिले आहेत. या संदर्भात इंडियन न्यूज पेपर एजन्सीने केलेल्या पाठपुराव्याला हे मोठे यश […]
अतिरिक्त उत्पन्नाची सुविधा
महावितरणच्या पेमेंट वॉलेटसाठी लघू उद्योजकांना संधी वीजबिलाचा भरणा अधिक सुलभ व्हावा, यासाठी महावितरणने सातत्याने नवनवीन सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. महावितरणने स्वतः चे पेमेंट वॉलेट सुरू केले असून आवश्यक अटींची पूर्तता करणाऱ्या पतसंस्था तसेच किराणा, मेडिकल व जनरल स्टोअर्सचालकांना वॉलेटधारक होता येईल. यातून वीज ग्राहकांना विशेषतः ग्राम ीण भागात […]
भारतीय बोली भाषांवर गंडांतर
भाषा ही केवळ भाषा नसते. तर, हजारो वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या भाषांमध्ये मूलभूत ज्ञानाचा एक महत्वपूर्ण संग्रह, ऐवज असतो. थेट अनुभवातून मिळालेले हे ज्ञान अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करण्यास सक्षम ठरत असते; परंतु या ज्ञानाची जणू आपल्याला गरजच नाही, अशा तऱ्हेने आपण आपल्या भाषांवर होणारे आघात निमूटपणे सहन करतो आणि ‘ज्ञानभाषा’ म्हणून […]