सध्याच्या युगात जाहिरात व मार्केटिंग क्षेत्राने कोणत्याही इंडस्ट्रीमधील एखादे निश्चित प्रॉडक्ट असो वा सेवेला यशाच्या शिखरावर पोहचवले आहे. दरम्यान, या यशात प्रॉडक्ट वा सेवेची गुणवत्तेचे देखील तेवढेच महत्त्व असते; पण या प्रॉडक्ट्सवरील प्रिंटेड (छापील) छायाचित्रे ही देखील लोकांच्या मनात घर निर्माण करतात, मग ते मासिकांचे मुखपृष्ठ असो वा रस्त्याच्या दुतर्फा […]
केमिकलमुक्त आंबा खा !
अकोला : उन्हाळ्याची चाहुल लागताच सर्वांना आठवतो तो आंबा. पण आता आंब्याची अस्सल चव रासायनिक खतांच्या माऱ्यात हरवली आहे. यासाठी अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसआय) महत्वाचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे यापुढे ग्राहकांना अस्सल आंबा मिळणार आहे. गेल्या काही वर्षांपासून बाजारात मोठ्या प्रमाणात केमिकलच्या मदतीने पिकवलेल्या आंब्यांची विक्री वाढली […]
‘गीता जीवन ग्रंथ आहे’ -संध्या संगवई
ग्राम शिर्ला (अंधारे )(८मार्च) – गीता जीवन ग्रंथ असून तो जिवाचा शिवाशी संवाद आहे असे प्रतिपादन ‘गीता आणि आपण’ या विषयावर बोलतांना जागतिक महिला दिनी श्री सोमपुरी महाराज जेष्ठ नागरिक संघाने आयोजित महिला सन्मान सोहळ्यात त्यांनी केले. तर पुष्पाताई इंगळे माजी अध्यक्षा जि .प. अकोला यांनी भारतीय संविधान घरा घरात […]
पुरुषांनो… जरा सांभाळून !
जिगोलो हा एक प्रकारचा पुरुष वेश्या आहे. उच्चभ्रू महिलांना शरीरसुख देण्यासाठी आपले शरीर विकणे हे त्याचे कार्य. या बदल्यात जिगोलोंना चांगली रक्कम मिळते. जिगोलोच्या रुपातून युवकांना काम देणाऱ्या अनेक कंपन्या परदेशात अगोदरपासून सक्रिय आहेत; परंतु भारतात याचा वापर करुन युवकांना फसवण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. जिगोलो, प्ले बॉय सर्व्हिस आणि […]
भरपूर पिकवा आणि तोट्यात जा !
ब्रिटेनमधील सुपर मार्केटमध्ये एका व्यक्तीला एक वेळा दोन टोमॅटो आणि दोन काकड्या खरेदी करता येणार आहेत. वेगवेगळ्या भाज्यांच्या विक्रीसाठी तेथील सरकारने काही मर्यादा निश्चित केल्या आहेत. याचे कारण ब्रिटनमध्ये आयात केल्या जाणाऱ्या देशात यंदा शेतमालाचे उत्पादन घटले आहे. भारतात मात्र काही शेतमालाच्या उत्पादनात मोठी वाढ झाल्यामुळे भाव कोसळले असल्याने शेतकरी […]
पाकिस्ताने कंगाल का झाला?
फाळणी झाल्यापासून पाकिस्तानने आर्थिक विकासाच्या धोरणांचा विचार कधीच गांभीर्याने केला नाही. धार्मिक कट्टरतेवर भर देत या देशाची वाटचाल होत राहिली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या दारात कटोरा घेऊन सर्वाधिक वेळा गेलेला देश म्हणून पाकिस्तानकडे पाहिले जाते. याउलट, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना, भारत हा सर्वाधिक वेगाने विकास करणारा देश म्हणून जगभरात ओळखला जात […]
‘वंदे भारत’ चा शिल्पकार
सध्या देशभर बोलबाला असलेली ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ ही रेल्वेत अधिकारी राहिलेल्या सुधांशू मणी यांची कल्पना. त्यांनी २०१६ ला देशातल्या पहिल्या सेमी हाय-स्पीड ट्रेनचे स्वप्न पाहिले आणि सहकाऱ्यांच्या सोबतीने साकार केले. आज सगळीकडे ‘वंदे ‘भारत’ चे जोरदार स्वागत केले जातेय; पण त्याच्या मुळाशी धणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेली अतोनात मेहनत हेच […]
भारतीयांचे आठवड्यातील ‘इतके’ तास मोबाईल गेममध्ये !
नवी दिल्ली : मोबाईलवर गेम खेळण्याची सवय केवळ लहान मुलांनाच असते असे नाही. अनेक तरुण व प्रौढ लोकांनाही ही सवय असते. ‘इंडिया मोबाईल ऑफ गेमिंग’च्या अहवालानुसार, भारतीय लोक आठवड्यातून सरासरी ८.३६ तास मोबाईल गेम खेळण्यात घालवतात. ६० टक्के गेमर्स एका वेळी सतत तीन तास गेम खेळतात. मोबाईल गेमच्या व्यसनात उत्तर […]
ज्येष्ठ नागरिक हे राष्ट्रीय संपत्ती आहेत : शौकतअली मीरसाहेब
अकोला : भारतीय संस्कृती आणि संस्कार हे जगात सर्वश्रेष्ठ असून ज्येष्ठ समाजाला नवीन दिशा देण्याचे काम करीत असतात तसेच ज्येष्ठ नागरिक हे राष्ट्रीय संपत्ती आहेत असे विचार अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शौकत अली मीर साहेब यांनी व्यक्त केले. त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघ अकोलाद्वारे करण्यात येत असलेल्या सामाजिक […]
प्रौढ साक्षरता अभियानाची शोकांतिका मांडणारी कादंबरी : निशाणी डावा अंगठा
एकीकडे भारत महासत्ता बनण्याची स्वप्न पाहत आहे. परंतु खऱ्या अर्थाने आजही समाजात अनेक समस्या दिसून येतात. साक्षरांचे प्रमाण देशात वाढताना दिसत असले तरी ही साक्षरता समाजाला योग्य दिशेने नेताना दिसते काय? हा खरा प्रश्न आहे. कादंबरीकार रमेश इंगळे उत्रादकर यांची ‘निशाणी डावा अंगठा’ या कादंबरीची पहिली आवृत्ती 19 फेब्रुवारी, 2005 […]