गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यासाठीचा शासन आदेश आज जारी करण्यात आला. याअंतर्गत भजनी मंडळांना ५ कोटी रुपयांपर्यंत अनुदान दिलं जाणार आहे. राज्य सरकार राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देणार आहे. याशिवाय अध्यात्म नाट्यरंग महोत्सव आणि ड्रोन शोचं आयोजित केला जाईल. राज्यातल्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पारितोषिकं देणं, राज्य व्याख्यानमालेचं आयोजन, राज्यातल्या प्रमुख गणेश मंदिरांचं तसंच सार्वजनिक गणेशोत्सवांचं ऑनलाईन दर्शन घेता यावं यासाठी पोर्टलची निर्मिती, घरगुती गणेशोत्सवाची छायाचित्रं अपलोड करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मची निर्मिती, रील्सच्या स्पर्धा वगैरे भरगच्च कार्यक्रम या अंतर्गत आयोजित केले जाणार आहे.

About The Author
Post Views: 37