अकोला : अभिजात मराठी भाषेतील प्राचीन साहित्याची ओळख अकोलेकरांना व्हावी यासाठी मायमराठीतील अनेकविध मौलिक ग्रंथ दि. ३ ते ९ ऑक्टोबर दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दर्शनी भागात प्रदर्शित केले जातील.
अभिजात मराठी सप्ताहाच्या अनुषंगाने सर्वसामान्यांमध्ये मायमराठी भाषेतील प्राचीन समृद्ध ठेव्याची ओळख व्हावी यासाठी राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सूचनेनुसार हे प्रदर्शन होणार आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेले मौलिक ग्रंथ यावेळी पहावयास मिळतील. त्यात महाराष्ट्राचा इतिहास प्रागैतिहासिक महाराष्ट्र खंड पहिला भाग-१, श्री ज्ञानेश्वरी मुक्तचिंतन, श्री नामदेव गाथा, गुणनंदी विरचित यशोधरचरित्र (इ. स. १५८१ मध्ये रचलेले मराठी चरित्रकाव्य), महानुभाव सांकेतिक शिरलिपी (पोथींसह लिप्यंतर) असे मौलिक ग्रंथ पाहता येणार आहेत.

About The Author
Post Views: 12