लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ४८ वा मासिक विचारमंथन मेळावा संपन्न

अकोला — पत्रकार आणि पोलिसांवरील सामाजिक जबाबदारी ही खूप मोठी आहे.गुन्हेगारीचे उच्चाटन करून समाज संरक्षण आणि लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी पत्रकार,समाज आणि पोलिसांच्या विधायक समन्वयाची वाटचाल हेच समृध्द लोकशाहीचे लक्षण आहे.पत्रकारांना कर्तव्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे,तेच स्वातंत्र्य लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या नावात सामावलेले आहे.त्यामुळे पत्रकार हेच स्वतंत्र पत्रकारितेतून लोकशाही बळकट करण्यासाठी बहूमोल कर्तव्याची भुमिका पार पाडू शकतात. असे महत्वपूर्ण प्रतिपादन अकोला येथील नवनियुक्त जिल्हा पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांनी केले.लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचा व्दितीय संघटन अभियानातील ४८ वा मासिक विचारमंथन समारोपीय मेळावा नुकताच पार पडला.या कार्यक्रमात विशेष प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. #Lokswatantrya_Patrkar_Mahasangh
लोकस्वातंत्र्यचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख हे अध्यक्षस्थानी तर ज्येष्ठ समाजसेवक प्रा.डॉ.संतोषकुमार हुशे,नारीशक्ती सेवा फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुमय्या अली,पत्रकार संभाजीराव टाले (खामगाव) तृतिय पंथियांसाठी कार्यरत सौ.वैष्णवी दातकर यांची व्यासपिठावर प्रमुख उपस्थिती होती. #Superintendent of Police Archit_Chandak
पत्रकार,समाज आणि पोलिस या समन्वयातून अपेक्षित कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती देतांना त्यांनी पत्रकारांमुळेच आम्हाला गुन्हेगारांची आणि घटनांची माहिती होते.ऑपरेशन प्रहारमधून दोन महिण्यात २ कोटीचा मुद्देमाल जप्त केल्याची आणि अंमली पदार्थाविरूध्द मिशन उडानचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी बॉक्सिंगमध्ये राज्यातून दोनवेळा मेडलप्राप्त सर्वप्रथम आलेल्या शोएब बुढन गाडेकर व तायकांडोमध्ये राज्यातून प्रथम येऊन खेलो इंडीयासाठी निवड झालेल्या कु.शौर्या आशिष वानखडे पाटील यांचा प्रोत्साहनपर सन्मानचिन्ह देऊन चांडक यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. पंजाबराव यांनी रचलेल्या गौरव कवितूची फ्रेम यावेळी पोलिस अधिक्षकांना देण्यात आली.लोकस्वातंत्र्य उपक्रमात सहभागी सभासदांना सहयोग सन्मानपत्रा़ंचे तर हार्ट अटॅकवर तात्पूरता ईलाज म्हणून “रामरक्षा” कीटचे वाटप यावेळी करण्यात आले.
सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबांना वंदन- अभिवादन आणि शहिदांसह वेगवेगळ्या घटनांमधील बळींना श्रध्दांजली वाहण्यात आली.प्रमुख अतिथींचे सन्मानचिन्ह शाल देऊन सन्मान करण्यात आले.नियुक्तीपत्रे व आयकार्ड वितरण आणि पत्रकार संभाजीराव टाले यांची बुलढाणा जिल्हाध्यक्षपदावर नियुक्तीची घोषणा यावेळी संजय देशमुख यांनी केली.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय सचिव राजेन्द्र देशमुख, पुष्पराज गावंडे, अंबादास तल्हार,सौ.जया भारती,अॕड नितीन धूत,किशोर मुटे,सौ.कल्याणी मुटे ( हिंगणघाट), ज्येष्ठ संजय कृष्णराव देशमुख, पत्रकार जगदिश अग्रवाल,पुरूषोत्तम मोरखडे,मोहम्मद फारूक,पंजाबराव देशमुख,आनंद गायगोळ,रामराव देशमुख,नानासाहेब देशमुख, वसंतराव देशमुख, जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर, सागर लोडम, आशिष वानखडे पाटील, मनोहर मोहोड,रमेश समुद्रे, बुढन गाडेकर,सतिश देशमुख,संतोष मोरे, गजानन मुऱ्हे, सैय्यद सज्जाद हुसेन,दिलीप नवले,अॕड.कृष्णा देशमुख, प्रा.विजय काटे,विजय देशमुख,राजाभाऊ देशमुख,अशोककुमार पंड्या, प्रा.सुरेश कुलकर्णी, डॉ.अशोक शिरसाट, अॕड.मुरलीधर इंगळे, जंमत देशमुख,अश्विनी बोरकर,अजय वानखडे,अविनाश भगत,विजयराव बाहकर,एजाज अहेमद खान, विजयराव बाहकर,अॕड.संकेत देशमुख,नरेन्द्र देशमुख,अनिल केळकर, फुलचंद मौर्य,आझम खान,राहुल खाडे,गजानन थोरात,अर्जूनराव घुगे,अनंत महल्ले,सुरेश भारती,विजय कुचे,अॕड.अनुराधा पवार,दिपक शिरसाट,शिवचरण डोंगरे,योगेश शिरसाट,राजेश वानखडे,नौशाद पटेल,गुलाम मोहसिन,गजानन वानखडे,अमित इंगळे,अभिजीत शिरसाट,फुलचंद वानखडे,,व बहूसंख्य पत्रकार उपस्थित होते.संचलन सौ.जया भारती यांनी तर आभारप्रदर्शन पुष्पराज गावंडे यांनी केले.