Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी

व्यसनाधीनता : सामाजिक कलंक !

On 4 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

वऱ्हाडवृत्त डिजिटल

समाजामध्ये वाढलेली व्यसनाधीनता पाहून मन विषण्ण होते. ज्यांचे तारुण्य अजून उमलायचे आहे असे तरुण युवक, तसेच कुटुंबातील वृद्ध नागरिक आज व्यसनाच्या आहारी गेले असून त्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. आजकाल मद्यपानाला प्रतिष्ठा लाभली आहे. प्रत्येक पार्टीत मद्य हवेच, अशी जणू फॅशनच झाली आहे. व्यसनाधीन मनुष्य आपली पत आपल्या हातून गमावतो. व्यसनामुळे आरोग्याची राखरांगोळी होते. विविध आजार आणि रोगांमुळे मृत्यूचा धोका निर्माण होतो. आजची युवा पिढी व्यसनाच्या आहारी जाऊ नये म्हणून प्रयत्न करणे गरजेचे आहे. व्यसनामुळे मरणाला कवटाळणान्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी व्यसनमुक्ती संस्थांकडून, तसेच शासकीय यंत्रणेकडून वेळोवेळी अभियान राबविले जाते. मद्यपानामुळे संपत्तीचा नाश, वाढती भांडणे, रोगाधीनता, शीलभ्रष्टता, अश्लील वर्तणूक व बुद्धीनाश ही संकटे ओढवतात म्हणून व्यसनाधीनता एक सामाजिक कलंक आहे. सशक्त समाजनिर्मितीसाठी आणि राष्ट्र हितासाठी युवकांनी व्यसनापासून दूर राहून आपल्या नवविविध कल्पनांनी आपला परिवार, समाज आणि राष्ट्राचा विकास साधावा. दारू, गांजा, चरस यासह मटका, जुगार ही सर्व व्यसने आपले शरीर व बुद्धीलाच पोखरत नाहीत, तर आपल्यासह परिवारालाही दुःखाच्या खाईत ढकलतात. लहानपणी लाडाने, कौतुकाने वाढविलेला मुलगा मोठेपणी वाईट संगत धरून व्यसनाच्या आहारी गेल्यावर आईवडिलांना झालेले दुःख कोणत्याही आपत्तीपेक्षा कमी नाही. व्यसन सर्वात आधी युवकाच्या बुद्धीवर ताबा मिळविते. त्यानंतर त्याच्या शरीरावर ताबा मिळविते. रक्तात भिनलेले हे व्यसन नात्यागोत्याची भावना नष्ट करून टाकते. तेव्हा जीवनात सुख, समृद्धी व आनंदाकरिता व्यसनापासून दूर राहावे.

In बातमी

Post navigation

देशातील पहिले खगोल निरीक्षण केंद्र लडाखमध्ये
आता वाहतूक पोलिसांवरच होणार कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ निकष व पात्रता

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

जगातील सर्वोत्कृष्ट तांदळांच्या यादीत अव्वल भारतीय बासमती तांदूळ ‘जगात भारी’!

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

कभी देश में नहीं देना पड़ता था इनकम टैक्स, अंग्रेजों ने की थी इसकी शुरुआत

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 1 year Ago

दहाव्या राज्यस्तरीय शुभम साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी शिवलिंग काटेकर

September 2022
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  
    Oct »