Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • आरोग्य
  • बातमी

सकाळी पाणी का प्यावे?

On 4 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

पाणी पिण्याच्या बाबतीत अनेक प्रकारचे नियम सांगितले जातात. भरपूर पाणी पिल्याने त्वचा चमकदार होते, अन्नपचन होते असे तर सांगितले जातेच पण आजकाल तेवढेच न सांगता इतरही काही बाबी सांगितल्या |जायला लागल्या आहेत. त्यातली पाहिली म्हणजे पाणी शक्यतो कोमट असेल तर प्यावे फार थंड पाणी पिऊ नये. सकाळी भरपूर पाणी प्यावे आणि संध्याकाळी कमी पाणी प्यावे. जसजशी रात्र होईल तसतसे पाण्याचे प्रमाण कमी करत न्यावे. वगैरे वगैरे नवे नियम आता पुढे येत आहेत. त्यातील सकाळी पाणी का प्यावे याची कारणमीमांसा सांगितली जाते ती खालीलप्रमाणे आहे.

सकाळी उठल्यानंतर कमीत कमीत एक ग्लास साधारण कोमट पाणी रिकाम्या पोटी प्यावे कारण त्यामुळे रात्री झालेले डिहायड्रेशन भरून निघते. आपण रात्री पाणी पित नाही. झोपेतले सात-आठ तास आपल्या शरीराला पाणी मिळालेले नसते. ती पाण्याची कसर सकाळच्या उपाशी पोटी पिलेल्या पाण्याने भरून निघते. सकाळच्या पाण्यामुळे पचन सुधारते. ते पाणी रक्तातील अशुध्द घटक वेगळे करते आणि रक्त शुध्दीकरण करते. एवढेच करून हे पाणी थांबत नाही तर ते नवीन रक्तपेशी निर्माण करते. नवीन स्नायूंची निर्मितीसुध्दा करते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वजन घटवण्यास ते उपयोगी पडते. असे सकाळचे पाणी पिल्यानंतर काही क्षण तर काही खाऊ नये. या पाण्याच्या उपायाचे कसलेही दुष्परिणाम होत नाहीत. तज्ञांच्या मते असे चार ग्लास पाणी प्यावे परंतु तेवढे जमत नसल्यास निदान एक ग्लास तरी प्यावाच हे प्रमाण वाढवत वाढवत चारापर्यंत न्यावे.

पचनक्रिया सुरळीत राहते

रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने तुमची पचनक्रिया व्यवस्थित राहते. रोज सकाळी पाणी पिण्याची सवय ठेवल्यास गॅस आणि पोटफुगीच्या समस्येपासून आराम मिळतो. शरीरातून विषारी पदार्थ देखील काढून टाकले जातात.

भूक वाढते

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्याने भूकही वाढते. यामुळे तुम्हाला सकाळचा नाश्ता करण्यात कोणतीही अडचण येत नाही आणि पोटभर नाश्ता केल्याने दिवसभर शरीरात ऊर्जा राहते. थकवाही वाटत नाही.

डोकेदुखी आराम

जर तुम्हाला डोकेदुखीची समस्या असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याची सवय लावा. वास्तविक, शरीरात पुरेसे पाणी नसल्यामुळे डोकेदुखी होते. त्यामुळे भरपूर पाणी प्या आणि रोज सकाळी एक ग्लास पाण्याने दिवसाची सुरुवात करा. त्वचेला ग्लो बनवते कोमट पाणी प्यायल्याने त्वचा चमकदार होते. शरीरात विषारी पदार्थ जास्त असल्यास त्वचेवर डाग पडतात. त्वचा निखळते आणि चमक निघून जाते. त्वचा टवटवीत होण्यासाठी पाणी उपयुक्त आहे. रोज सकाळी एक ग्लास पाणी प्यायल्याने डाग दूर होण्यास मदत होते.

In आरोग्य बातमी

Post navigation

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा
मराठवाडा मुक्तिसंग्राम : स्वामी रामानंद तिर्थ यांचे नेतृत्व; अनेक मार्गांनी लढा पेटला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

जगातील सर्वोत्कृष्ट तांदळांच्या यादीत अव्वल भारतीय बासमती तांदूळ ‘जगात भारी’!

  • आरोग्य
  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

टायफॉईडची लस तयार

  • बातमी
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

शासनाची ज्येष्ठ नागरिक कार्यकारी समिती गठित

  • आरोग्य
  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

भोजन के बाद क्यों खाते हैं सौंफ, पान

September 2022
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  
    Oct »