Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र

बाईक किंवा कारच्या टाकीत अनेक दिवस पेट्रोल राहिलं, तर ते खराब होतं का?

On 4 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सगळेच चिंतेत आहेत. अनेकांनी कुठेही जाण्यासाठी कारऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणं आता सुरू केलं आहे. तर अनेक लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळले आहेत. ज्यामुळे बऱ्याच लोकांच्या गाड्या त्यांच्या इमारतींच्या खाली धुळ खात उभ्या राहिल्या आहेत. परंतु तुम्ही कधी असा विचार केलाय का, की तुमच्या बाईक किंवा कारमधील पेट्रोलचं कालांतराने काय होतं? ते कधी खराब होतं का? __ आता अनेकांना हा प्रश्न देखील पडला असेल की, पेट्रोल किंवा डिझेलची कोणतीही एक्स्पायरी डेट असते का? काही वेळाने पेट्रोल आणि डिझेलही खराब होते का? चला आपण याबद्दल एका उदाहरणा मार्फत समजन घेऊ या.

पेट्रोल आणि डिझेल हे कच्च्या तेलापासून बनवले जाते. कच्च्या तेलापेक्षा पेट्रोल किंवा डिझेल वेगाने खराब होऊ लागते. वास्तविक, पेट्रोल आणि डिझेल बनवण्यासाठी कच्चे तेल शुद्ध करताना त्यात अनेक प्रकारची रसायने मिसळली जातात. त्यात इथेनॉलही टाकले जाते. या प्रकरणात पेट्रोल आणि डिझेलचे शेल्फ लाइफ कमी होते.

जास्त वेळ वाहने उभी करून त्यात पेट्रोल टाकले तर तापमानाबरोबर काही रसायनांचे वाफेत रुपांतर होऊन पेट्रोलडिझेल सडू लागते.

आता पेट्रोल आणि डिझेल किती वेळात खराब होते असा प्रश्न जर उपस्थीत होतो. तर हे होणं तापमानावर अवलंबून असतं, या प्रश्नावर अनेक दशके ऑटोमोबाईल वर्कशॉप चालवणारे गगन कुमार म्हणाले. तापमान असेच वाढले, तर डिझेल-पेट्रोल लवकरात लवकर खराब होऊ शकते. अशा परिस्थितीत जर तुमची कार १ महिना सतत उभी राहिली असेल आणि ती उन्हात उभी असेल, तर तुमच्या कारमध्ये पडलेले तेल लवकर खराब होऊ शकते. जर गाडी ३० डिग्री म्हणजेच नॉर्मल टेम्परेचरमध्ये पार्क केली तर ३ महिने किंवा २० डिग्री तापमान असेल, तर त्यात पडलेले ऑईल ६ महिनेही चांगले राहू शकते. तसेच हे ही लक्षात घ्या की, तुम्ही| खराब झालेल्या इंधनाने गाडी चालवली तर त्याचा परिणाम इंजिनवरही होतो. यासोबतच वाहनाचा कार्बोरेटर, इंधन पंप निकामी होण्याची शक्यता असते.

In बातमी महाराष्ट्र

Post navigation

तणाव आणि हृदयविकार
तुमचे फुप्फुस निरोगी आहे का ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 9 months Ago

Maratha reservation  : आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस, मराठा आरक्षणावर सरकारला इशारा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

नागपूर ते गोवा महामार्ग ११ जिल्हे जोडणार

  • बातमी
  • महाराष्ट्र
  • विशेष लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

शरीरावरील तीळ खूप काही सांगतात

  • बातमी
  • महाराष्ट्र
  • विशेष लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

खोटे गुन्हे आणि हल्ल्यांविरोधात पत्रकारांना आता आक्रमक व्हावं लागेल..!

September 2022
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  
    Oct »