Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र

आता वर्षाला फक्त १५ तर महिन्याला मिळणार दोनच सिलेंडर

On 4 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क

घरगुती एलपीजी ग्राहकांना आता सिलेंडरसाठी रेशनिंग प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. नव्या नियमांनुसार, एका कनेक्शनवर वर्षभरात आता फक्त १५ सिलेंडर मिळणार आहेत. घरगुती एलपीजी ग्राहकांना १५ पेक्षा जास्त सिलेंडर दिले जाणार नाहीत. त्यासोबतच एका महिन्याचा कोटाही निश्चित करण्यात आला आहे. कोणताही ग्राहक एका महिन्यात दोनपेक्षा जास्त सिलेंडर घेऊ शकणार नाही.

आत्तापर्यंत घरगुती विनाअनुदानित कनेक्शन असलेल्या ग्राहकांना हवे तेव्हा आणि वर्षभरात लागतील तेवढे सिलेंडर मिळत होते. पण आता नव्या नियमांनुसार, घरगुती एलपीजी ग्राहकांना वर्षभरात ठराविक म्हणजेच, केवळ १५ सिलेंडर मिळणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तीनही तेल कंपन्यांकडून ग्राहकांसाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे. अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरसाठी नोंदणी केलेल्यांना या दराने वर्षभरात फक्त १२ सिलेंडर मिळणार आहेत. यापेक्षा जास्त सिलेंडरची गरज भासल्यास ग्राहकांना अनुदान नसलेले सिलेंडर घ्यावे लागतील. नव्या नियमांनुसार, रेशनिंग अंतर्गत एका कनेक्शनवर कोणत्याही परिस्थितीत ही संख्या एका वर्षात १५ पेक्षा जास्त असू शकत नाही. जर एखाद्या ग्राहकाला गॅसची जास्त किंमत मोजावी लागत असेल, तर त्याचा पुरावा देऊन त्याला तेल कंपनीच्या अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल. तरच त्या ग्राहकाला अतिरिक्त रिफिल मिळू शकेल. घरगुती एलपीजी सिलेंडरवर घालण्यात आलेल्या मर्यादेबाबत वितरकांनी दिलेल्या माहितीनुसार, सिलेंडरसंदर्भातील रेशनिंगसाठीच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच, याची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली आहे. तसेच, यासंदर्भात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. अनुदानित घरगुती गॅसचे रीफिल हे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या रिफिलहून महाग असल्याने अनेकदा व्यावसायिक वापरासाठी अनुदानित घरगुती गॅस रीफिलचा वापर केला जातो. यासंदर्भातील अनेक तक्रारी वारंवार समोर येत असल्याने घरगुती एलपीजी सिंलेडरवर मर्यादा आणण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

In बातमी महाराष्ट्र

Post navigation

उत्तराखंडमध्ये पाचशे रुपये भरा, रात्र तुरुंगात काढा
पाकिस्तान जिंदाबाद म्हणणारे त्या देशात जाणार का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
  • विशेष लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

क्रूरकर्मा चेंगिझखान

  • काव्याधारा
  • बातमी
VARHADVRUTT WEB TEAM
On 4 years Ago

वऱ्हाडी बोलीभाषेतील लघुकथा  :  बझार

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 4 years Ago

खरेधर्मप्रसारक बहुरूपीशासनाच्या योजनांपासून वंचित

  • बातमी
  • लोकप्रिय लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 4 years Ago

क्रांती इंटरनेटची, लाभ मानवाला

September 2022
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  
    Oct »