Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र

सम्राट अशोकाच्या शिलालेखावर अतिक्रमण शिलालेखाचे रूपांतर केले कबरीत

On 4 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क

बिहारमधील सासाराम येथे सम्राट अशोकाच्या शिलालेखावर एक कबर बांधण्यात आली असून यामुळे आता वाद निर्माण झाला आहे. 2300 वर्षांपूर्वी सम्राट अशोकाने लिहिलेला लघुशिलालेख सासारामच्या चंदन पहाडीवर आहे. त्यावर काही लोकांनी अतिक्रमण करून त्याला कबरीचे स्वरूप दिले आहे. हा शिलालेख चंदन पहाडीवर 256 दिवसांचा उपदेश पूर्ण झाल्यानंतर लिहिला गेला. सासाराम येथील चंदन पहाडी येथे सुमारे 2300 वर्षांपूर्वी सम्राट अशोकाने एक लघु शिलालेख कोरला होता. कलिंग येथील युद्धानंतर सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला आणि तो देशासह जगभरात बौद्ध धर्माचा प्रचार करू लागला. त्याच दरम्यान सारनाथच्या दिशेने जाताना सम्राट अशोक या पहाडीवर थांबले होते. त्यांनी आपल्या धर्मप्रसाराला 256 दिवस पूर्ण झाल्याच्या प्रतिकासाठी हा शिलालेख कोरला आणि तो स्थापन केला. संपूर्ण देशात सम्राट अशोकाचे असे काही मोजकेच शिलालेख अस्तित्वात असून बिहार राज्यातील हा शिलालेख एकमेव आहे. असं असूनही आता त्या शिलालेखावर अतिक्रमण करण्यात आले असून त्यावर चुन्याचा लेप देत त्यावर हिरवी चादर चढवून त्याला कबरीचे स्वरूप देण्यात आले आहे. संच या शिलालेखाच्या खोलीला कुलूपबंद करण्यात आले आहे. हा शिलालेख भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असून 1917 सालीच संरक्षित पुराणवस्तू म्हणून घोषित करण्यात आला आहे. तरीही त्याचे रुपांतर कबरीत केल्याने आता या शिलालेखाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

In बातमी महाराष्ट्र

Post navigation

एका चिमटीची जादू : हिंग
जगभरात हिंदूंविरोधात राग का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
VARHADVRUTT WEB TEAM
On 4 years Ago

संपूर्ण जग बंद पाडणारा कोरोना लवकरच होणार हद्दपार! WHO चे संकेत

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

Climate change | हवामान बदलाचा भारतातील प्रत्येकावर परिणाम होत आहे: डॉ. स्वामीनाथन

  • आरोग्य
  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 9 months Ago

 Lukewarm water | चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली : कोमट पाणी

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 5 months Ago

शिक्षक भरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद राबवणार

September 2022
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  
    Oct »