Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र

वऱ्हाड लोककला संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. गणेशचंदनशिवे

On 4 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

शिवाजी महाविद्यालयात राज्यस्तरीय संमेलन

अकोला – महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, प्रस्तुत वहाड शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था, लोणी व मराठी विभाग श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, २३ नोव्हेंबर रोजी तिसरे राज्यस्तरीय वहाड लोककला साहित्य संमेलन श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला येथे  होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉ. गणेश चंदनशिवे यांची निवड करण्यात आली आहे. चंदनशिवे हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोककलावंत असून, चंदनशिवे यांनी विपुल अभिनय केला असून, अनेक मराठी, हिंदी नाटकांचे दिग्दर्शनही केले आहे. महाराष्ट्र शासन, लोककला अकादमी, मुंबई विद्यापीठ आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांनी मानद तमाशा लोकनाट्य कार्यशाळा घेतल्या आहेत. तमाशा विषयात पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले असून, मुंबई विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

संमेलनामध्ये उद्घाटन (सकाळी १० ते ११.३०), बोलीभाषा, लोककला व लोकसंस्कृती या विषयावर परिसंवाद (११.३० ते १२.३०) यानंतर विदर्भातील विविध कलांचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये बंजारा होळी नृत्य, खंजिरी भजन, गोंधळ, भारूड, राम ढोलाचे भजन, मथुरा लभाण लोकनृत्य व चंदनशिवे यांची लोककला सादर होणार आहे. डॉ. केशव सखाराम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समारोपीय कार्यक्रम होणार आहे. तसेच, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. रवींद्र शोभणे, पुष्पराज गावंडे यांचे मार्गदर्शन या संमेलनाला लाभणार आहे.

लोककलेत तरूणांना संधी

या संमेलनाचे मुख्य आकर्षण डॉ. गणेश चंदनशिवे यांचे लोककलेत तरुणांना संधी, चंदनशिवे यांची दुसऱ्या सदरात सादर होणारी लोककला व मथुरा लभाण लोकनृत्य असल्याची माहिती वहाड संस्थेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब काळे यांनी दिली आहे.

In बातमी महाराष्ट्र

Post navigation

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६ पदाधिकार्‍यांना सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “चला जाणुया नदीला” अभियानास खारपाणपट्ट्यात सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 4 years Ago

सैनिकांसोबत दिवाळी हर्षोल्लासात  संपन्न

  • बातमी
  • महाराष्ट्र
  • लोकप्रिय लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 3 years Ago

१२ राशी व त्यांचे स्वभाव

  • बातमी
  • महाराष्ट्र
  • विशेष लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 3 years Ago

चांद्रमोहिमेची गरुडझेप

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

महाराष्ट्र निवडणूक प्रचारादरम्यान गोविंदाची तब्येत बिघडल्याने त्यांनी रोड शो मध्येच सोडला आणि छातीत असह्य वेदना होत असताना ते परतले

November 2022
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Oct   Dec »