Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र

कलावंतांना व्यासपीठ देणारे सह्याद्री फाउंडेशन हे एकमेव संस्था- उपजिल्हाधिकारी खडसे

On 4 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

कलावंताचा स्नेह मिलन आणि सत्कार समारंभ सोहळा संपन्न

वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क

अकोला : (प्रतिनिधी स्थानिक ) दीवाळी निमित्त कलावंताचा स्नेहमिलन् समारंभ  तथा सत्कार सोहळा आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे म्हणाले की “महानाट्य सह्याद्री”  च्या माध्यमातून अकोला जिल्ह्यातील सर्व कलावंतांना हक्काचे व्यासपीठ संस्थापक अध्यक्ष  निर्माता निर्देशक प्रा. निलेश जळमकर यांच्या “सह्याद्री फाउंडेशन”  च्या माध्यमातून मिळून दिले आहे.

त्यावेळी विचारपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दीपक मोरे  तर प्रमुख अतिथी म्हणून लेखक एड.अनंत खेळकर, डॉ. नितीन गायकवाड, गणेश बोरकर प्रा.सतीश फडके सह्याद्रीचे संस्थापक अध्यक्ष निलेश जळमकर आधी विचारपीठावर उपस्थित होते त्यावेळी राज्य नाट्य पुरस्कार विजेते तथा विविध नाट्य स्पर्धे चे विजेते कलावंत अमोल ताले,उदय दाभाडे, काजल राऊत,महेश बागडिया,भावना भोपाळे , गीता जोशी,आरती तायडे,अक्षय पिंपरकर,प्रवीण इंगळे, कृष्णा शर्मा आदी कलावंतांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला शहरातील नवोदित कलाकारां पासून ते ज्येष्ठ कलावंत यांची उपस्थिती होती. सोहळ्याचे प्रास्ताविक दिग्दर्शक निलेश जळमकर यांनी केले. कलावंताच्या वतीने  ज्येष्ठ लेखक, नाट्यकर्मी अरविंद विश्वनाथ यांनी मनोगत व्यक्त केले. कवी निलेश कवडे व प्रशांत जामदार, नितीन वरणकार याच्या बहारदार काव्यवाचनाने कार्यक्रमाला रंगत आली .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ .बुरगुरे यांनी केले तर  सचिन गिरी यांनी पुरस्काराचे स्वरूप व कलावंत चे परचय मांडले .तर आभार प्रदर्शन प्रफुल कानकिरड यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीसाठी विशाल कामले, महेश इंगळे, अभिषेक अंबुस्कर, अनिकेत देशमुख, नैना जाधव, गिरिराज आखरे, प्रवीण खुमकर, अभिजीत पवार, शुभम भांबेरे, पूजा थातूरकर,ॲड. सुनील डोंगरदिवे, संदीप देशमुख यांनी प्रयत्न केले.

In बातमी महाराष्ट्र

Post navigation

सैनिकांसोबत दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन
९६ व्या संमेलनात साहित्यातील प्रबोधन परंपरेवर परिसंवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 1 year Ago

बल्लारपूर पेपर उद्योग संकटात, ९०० पैकी ३४७ पेपर मिल बंद

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

जन्मदिवसावरून ठरतो स्वभाव

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 9 months Ago

Diwali 2025 : या वर्षीही कार्तिक अमावस्या दोन दिवसांची आहे, ऑक्टोबर २०२५ मध्ये दिवाळी कधी साजरी होईल

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 5 months Ago

९९ वे अ. भा. साहित्य संमेलन साताऱ्यात

November 2022
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Oct   Dec »