Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र

दूरदर्शनच्या सगळ्या मोफत वाहिन्या सेट टॉप बॉक्सविना पाहता येणार

On 3 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

नव्या मानकांनुसार टी. व्ही. तच असेल सॅटेलाईट ट्यूनर
दूरदर्शनच्या मोफत वाहिन्या पाहण्यासाठी यापुढे सेट टॉप बॉक्सची गरज राहणार नसून, त्यासाठी इनबिल्ट सॅटेलाईट ट्यूनर असलेले टी.व्ही. उत्पादकांना तयार करावे लागणार आहेत. भारतीय मानक संस्थेने टी.व्ही.साठी ठरवलेल्या नवीन मानकांत याचा समावेश करण्यात आला आहे.
सध्या मोफत असो, की सशुल्क वाहिन्या असोत, त्या बघण्यासाठी ग्राहकांना डिश अँटेना व सेट टॉप बॉक्स खरेदी करावाच लागतो. फक्त
मोफत वाहिन्या बघण्यासाठीही हा खर्च करावाच लागतो. यात आता सुधारणा करण्यासाठी भारतीय मानक संस्थेने टी.व्ही. बाबत नवीन मानके निर्धारित केली आहेत. त्यानुसार ग्राहकांना आता दूरदर्शनच्या मोफत वाहिन्या बघण्यासाठी सेट टॉप बॉक्सचा भुर्दंड सहन करावा लागणार नाही. एक छोटासा डिश अँटेना छतावर बसवावा लागेल. मोफत वाहिन्या पाहता याव्यात यासाठी टी.व्ही. संचातच सॅटेलाईट ट्यूनर असेल. याचाच अर्थ आता येणाऱ्या टी.व्ही. संचात इनबिल्ट सॅटेलाईट ट्यूनर असतील. त्यासाठी टी.व्ही. कंपन्यांना उत्पादनात काही बदल करावे लागतील. मात्र, त्यामुळे दूरदर्शनच्या मोफत वाहिन्या सेट टॉप बॉक्सविना प्रेक्षकांना पाहता येतील.
दुसरीकडे, सध्या दूरदर्शन जुन्या तंत्रावर आधारित अॅनालॉग प्रसारण टप्प्याटप्प्याने बंद करून डिजिटल होत आहे. त्याचाही या निर्णयाला फायदा होणार आहे. मनोरंजनासह शैक्षणिक, विविध विषयांना वाहिलेल्या दूरदर्शनच्या मोफत वाहिन्या देशभरातील नागरिकांना विना सेट टॉप बॉक्स बघता येणार आहेत.

In बातमी महाराष्ट्र

Post navigation

पत्रकार आणि सामाजिक संस्थांना देणार पुरस्कार
दहावी, बारावी परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्याचे आव्हान कॉपीबहाद्दरांना कसे रोखायचे… नवनवीन कल्पना सुचवा बोर्डाची विद्यार्थी, शिक्षक, पालक, समाजघटकांसाठी अनोखी स्पर्धा उत्कृष्ट आयडिया सुचविणाऱ्यांचा यथोचित सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
VARHADVRUTT WEB TEAM
On 1 year Ago

Indian Railway : वेटिंग तिकीटावर प्रवास केल्यास दंड! ट्रेन तिकीट बुकिंगचे नवे नियम लागू

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

वारानुसार वापरावे या रंगाचे कपडे

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 4 years Ago

इंडीयन लॅंग्वेज न्यूजपेपर्सची सभा दिल्लीमध्ये संपन्न; ईलना स्वतंत्र कार्यालयाचा श्री.प्रकाशभाऊ  पोहरे यांचा प्रस्ताव मंजूर

  • बातमी
VARHADVRUTT WEB TEAM
On 1 year Ago

लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार पुढचा हप्ता

January 2023
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Dec   Feb »