Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र

कामदेव

On 3 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

हिंदू पुराणकथांत वर्णिलेली, तरुण स्त्री-पुरुषांच्या चित्तांतील प्रेमाची अधिष्ठात्री देवता. कामदेवाचा जन्म प्रथम ब्रह्मदेवाच्या हृदयापासून झाला. तोच पुन्हा श्रीकृष्ण-रुक्मिणी यांच्यापासून प्रद्युम्न नावाने उत्पन्न झाला. मन्मथ, आत्मभू, अनंग, मार, मनसिज, कंदर्प, स्मर, पुष्पधन्वा, पंचशर, रतिपती, मीनकेतन, दर्पक, मदन इ. नावांनीही कामदेवाचा उल्लेख केलेला आढळतो.

कामदेवाच्या प्रभावानेच ब्रह्मदेव व त्याची मुलगी संध्या यांच्या चित्तांत परस्परांविषयी कामविकार उत्पन्न झाला. ही गोष्ट पाहून शंकराने ब्रह्मदेवाचा उपहास केला, तेव्हा ब्रह्मदेवाने रागावून कामदेवास शाप दिला. शापानुसार तो शंकराकडू जाळला गेला व अशरीरी झाला. नंतर ब्रह्मदेवाच्या उःशापाने शंकर-पार्वतीच्या मीलनानंतर तो पुन्हा शरीरधारी झाला. संध्येनेही तपश्चर्या करून विष्णूला संतुष्ट केले आणि ‘जन्मतःच प्राणिमित्रांच्या चित्तांत काम उत्पन्न होऊ नये’ असा वर मागितला. या वरामुळे प्राणी जन्मतःच सकाम नसतात, तर ते तारुण्यात सकाम होतात अशी कथा आहे. कामदेवाचे धनुष्य व बाण दोन्ही पुष्पमय आहेत. त्याचे धनुष्य इक्षुदंडाचे असल्याचाही उल्लेख आढळतो. रक्तकमल, नीलकमल, आम्रमंजरी, अशोकपुष्प व मोगरा ही पाच पुष्पे त्याचे पाच बाण आहेत. संमोहन, उन्मादन, शोषण, तापन व स्तंभन यांचाही कामाचे पाच बाण म्हणून उल्लेख आढळतो. बाणांच्या सहाय्याने तो तरुण-तरुणींची हृदये विद्ध करतो. वसंतोत्सवात कामदेवाची पूजा करण्याची प्रथा आहे. वसंतऋतू त्याचा मित्र आहे. शुक हे त्याचे वाहन होय. दक्षकन्या रती ही त्याची पत्नी. ‘रूपाने अत्यंत सुंदर, अष्टबाहू, चार हातांत शंख, पद्म, धनुष्य व बाण. राहिलेले चार हात रती, प्रीती, शक्ती व उज्ज्वला या चार स्त्रियांच्या स्तनांवर ध्वजावर मकर वा मीन’ असे त्याच्या प्रतिमेचे वर्णन आहे.

In बातमी महाराष्ट्र

Post navigation

Mobile | मोबाईल फोनची पन्नाशी!
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन; दि.३१ जुलै २०२३ अंतिम मुदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

महाभारतात द्रौपदीची भूमिका करणाऱ्या रूपा गांगुलीला अटक करण्यात आलीरात्रभर आंदोलन केले

  • बातमी
  • महाराष्ट्र
  • विशेष लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 3 years Ago

mahatma jyotirao phule | बहुजन समाजातील कर्मवीर महात्मा जोतीराव फुले

  • बातमी
  • महाराष्ट्र
  • विशेष लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 1 year Ago

RUPEE SYMBOL |भाषावाद पेटला, तामीळनाडूने अर्थसंकल्पातून ‘₹’ चिन्ह काढून टाकले, त्याऐवजी ‘ரூ’ चिन्ह लावले

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 5 months Ago

बीजिंगने प्रदूषणावर कशी केली मात? जगासाठी ठरतोय आदर्श

July 2023
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jun   Aug »