Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र

संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांना ५ वर्षांत एकदाच द्यावा लागणार उत्पन्न दाखला

On 3 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना राबवण्यात येते. या योजनेतील लाभार्थ्यांकडून दरवषी आर्थिक वर्ष संपल्यानंतर एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्नाचा दाखला घेण्यात येत होता. मात्र ५० वषावरील ज्येष्ठ, वृद्ध नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ज्यांचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक आहे, अशा लाभार्थ्यांना पाच वर्षांमध्ये एकदाच उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. यामुळे ५० वर्षांवरील लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारांमुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या; परंतु पोटगी न मिळालेल्या अत्याचारित व वेश्या वयवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी, ३५ वर्षांवरील अविवाहित स्त्री, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो. श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्ती योजनेमधनू दारिद्र्यरेषेखालील यादीच्या कुटुंबात नाव असलेल्या व रु.२१,००० पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पात्र लाभार्थ्यास अर्थसहाय्य देण्यात येते.

In बातमी महाराष्ट्र

Post navigation

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन; दि.३१ जुलै २०२३ अंतिम मुदत
पृथ्वीचा घडा कलंडतोय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 4 years Ago

सैनिकांसोबत दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन

  • आरोग्य
  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 5 months Ago

सकाळी आरोग्यदायी सवयी, दिवसभर ऊर्जा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 6 months Ago

शोध संपत नाही… पण धरमजींची आठवण कधीच संपणार नाही; धर्मेंद्र यांना आठवून अमिताभ बच्चन भावूक

  • बातमी
  • महाराष्ट्र
  • लोकप्रिय लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 4 years Ago

भिडभाड न बाळगणारे विक्रम गोखले

July 2023
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jun   Aug »