Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र

अकोल्यातील प्रवाश्यांना अयोध्येला जाण्यासाठी जावे लागेल अमरावतीला !

On 2 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

अकोला : अयोध्या येथील प्रभू श्रीरामाचे मंदिर भाविकांसाठी २२ जानेवारीपासून खुले होत आहे. रामभक्तांना रामलल्लांचे दर्शन घेता यावे, यासाठी अमरावती रेल्वेस्थानकावरून दर्शननगर अयोध्या आस्था रेल्वेची विशेष रेल्वेगाडीच्या दोन फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळें अकोल्यातील प्रवाश्यांना आयोध्येला जाण्यासाठी अमरावतीला जावे लागणार आहे. मध्य रेल्वेने अमरावती रेल्वे स्थानकावरून ७ व २५ फेब्रुवारीला दर्शननगर अयोध्या आस्था रेल्वेची सोय केली आहे. ही रेल्वे ९ व २७ फेब्रुवारीला अयोध्येहून परत निघेल. त्यामुळे कोणत्याही अडचणीशिवाय प्रवाशांना थेट अयोध्येला जाणे व दर्शन घेतल्यानंतर परत येणे शक्य होणार आहे.

जास्तीत जास्त भाविकांनी रामलल्लांचे दर्शन घेता यावे यासाठी रेल्वेने देशभरातील विविध ठिकाणांहून अयोध्येसाठी आस्था विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. अमरावतीतूनही अयोध्येसाठी रेल्वे गाडी सोडावी, अशी मागणी होती. त्यानंतर आस्था रेल्वेच्या अमरावतीला दोन फेऱ्या मिळाल्या आहेत. या गाडीचे बुकिंग फक्त आयआरसीटीसी मार्फतच होणार आहे. तसेच भाविकांना रेल्वेत शाकाहारी जेवण दिले जाणार आहे.

नवी अमरावती (अकोली) रेल्वे स्थानकापासून अयोध्येतील दर्शननगर रेल्वे स्टेशन हे अंतर १४५२ किमी. असून २६ तास ५० मिनिटांचा हा प्रवास आहे. नवी अमरावती रेल्वे स्थानकावरून पहाटे ५.१५ वाजता ही गाडी प्रस्थान करेल. मार्गात वर्धा, नागपूर, काटोल, नरखेड, पांढुर्णा व इतर स्टेशनवरून पुढे जात सकाळी ८.०५ वाजता दर्शननगर अयोध्या येथे पोहोचेल. परतीचा प्रवास हा २७ तास १० मिनिटांचा आहे. दर्शननगर अयोध्या येथून ही गाडी सायंकाळी ६.५० वाजता नवी अमरावतीकडे निघेल व दुसऱ्या दिवशी रात्री १० वाजता पोहोचेल. या गाडीला एकूण २२ डबे असून, त्यात २० स्लीपर कोच तर दोन गार्डचे कोच राहणार आहेत. ७ फेब्रुवारीला खासदार नवनीत राणा, खासदार डॉ. अनिल बोंडे हे रेल्वेगाडीला हिरवी झेंडी दाखवतील. या गाडीमध्ये राम भक्तांची सोय झाली आहे. मात्र अयोध्येला जाण्यासाठी पहिल्यांदा अमरावतीला पोहचावे लागणार आहे.

In बातमी महाराष्ट्र

Post navigation

पंतप्रधान मोदींच्या वडनगर गावी २,८०० वर्षे जुन्या वस्तीचे पुरावे; आतापर्यंत सापडले एक लाखाहून अधिक अवशेष
कुंडीतील रोपांसाठी घरगुती खत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 4 years Ago

बालकामगार निर्मूलनासाठी नेटवर्क स्थापन

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

विरंगुळा केंद्रासाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार प्रकाश भारसाकळे

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 8 months Ago

एलपीजी संपले, वायफाय बंद: मुलाने रागाच्या भरात आईला केली मारहाण

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 6 months Ago

‘झेब्रु’ शुभंकरामुळे जनजागृतीला गती

January 2024
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Dec   Feb »