Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र

शासनमान्य ग्रंथालयांना पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

On 2 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालया कडून देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी ९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.

राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयांकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालय सेवा मिळाव्यात, वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार’, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार’ देण्यात येतो.

राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ ब क ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे रुपये १ लाख, रुपये ७५ हजार, रुपये ५० हजार व रुपये २५ हजार रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते.

राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट कार्यकर्ता व एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी रुपये ५० हजार रोख रक्कम आणि प्रमाणपत्र तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट कार्यकर्ता व उत्कृष्ट सेवक यांना प्रत्येकी रुपये २५ हजार रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते.

सन २०२२-२३ या वर्षातील पुरस्कारासाठी इच्छूक ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक यांनी पुरस्कारासाठी विहित नमुन्यातील अर्ज तीन प्रतीत मुदतीत त्यांच्याजिल्हयातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

In बातमी महाराष्ट्र

Post navigation

कुंडीतील रोपांसाठी घरगुती खत
जानिये कैसे स्मार्टफोन की लाइट आपके स्वास्थ्य के लिए हानिकारक है?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 8 months Ago

भारतीय तुरुंगांमध्ये वाढते परदेशी कैदी: कोणत्या राज्यात सर्वाधिक गुन्हेगार शिक्षा भोगत आहेत?

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

‘जगातील लोकांनी जम्मू-काश्मीरचे सौंदर्य अनुभवावे’

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 3 years Ago

घरबसल्या चेक करा ई-चलन स्टेटस

  • आरोग्य
  • बातमी
VARHADVRUTT WEB TEAM
On 6 months Ago

देशात तोंडाच्या आणि स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढले; पुरुषांत तोंडाचा कर्करोग अधिक – डॉ. मामेन चांडी

January 2024
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Dec   Feb »