Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • आरोग्य
  • बातमी
  • महाराष्ट्र

ऑफिसमध्ये स्टेस फ्री राहण्यासाठी टिप्स

On 2 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

कोणतेही काम करताना तुमचे मानसिक आरोग्य उत्तम असेल, तर तुम्ही ते काम योग्यरीत्या करू शकाल. कारण उत्तम मानसिक आरोग्यामुळे तुमचा आत्मविश्वास तर वाढतोच, पण कार्यक्षमताही सुधारते, पण अनेकांना ऑफिसमध्ये काम करताना स्ट्रेस जाणवतो. जाणून घेऊयात यावरील काही टिप्स.

ऑफिसमध्ये मानसिक आरोग्य इतके महत्त्वाचे का आहे?

आपल्या मानसिक आरोग्याचा आपल्या कामावर परिणाम होत असतो. त्यामुळे ऑफिसमध्ये काम करताना तुमचे मानसिक आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे.

ऑफिसमध्ये स्ट्रेस फ्री राहण्यासाठी काही टिप्स –

■  भावना शेअर करणे : कामाच्या ठिकाणी मनमोकळणेपणे बोलणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्हाला एखादी गोष्ट पटत नसेल, तर अवश्य बोलावे कारण ती तुम्ही मनात दडवून ठेवल्यास त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यवर परिणाम होऊ शकतो.

■ नियमित व्यायाम करा : दररोज व्यायाम करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. परिणामी तुमचा आत्मविश्वास वाढतो. अशाने तुम्ही पूर्ण एकाग्रतेने काम करू शकाल. लक्षात ठेवा दररोज व्यायाम करणे म्हणजे असे नाही की कोणताही स्पोर्ट्स खेळणे किंवा जिमला जाणे. तज्ज्ञांच्या मते आठवड्यातून किमान ५ दिवस सुमारे ३० मिनिटे व्यायाम करायला हवा. वेळ नसेल तर वर्किंग वुमनने जेवणानंतर फिरण्याचा प्रयत्न करावा. अशाने शरीराबरोबरच  मनही शांत होईल.

■ सकस आहार घ्या : डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार खाण्या-पिण्याचा आपल्या भावनांवर लगेचच किंवा दीर्घकाळ परिणाम होतो. जो आहार आपल्या शरीरासाठी चांगला असतो, तो मानसिक आरोग्यासाठीही चांगला असतो. यासाठी सकस आहार घेणे आणि भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. यासाठी जेवणाची ठराविक वेळ असणे गरजेचे असते. जास्तकरून घरच्या जेवणाला प्राधान्य द्या. तसेच जर बाहेरून ऑर्डर करणार असाल, तर हेल्दी पर्याय निवडा.

■ फ्रेण्ड्स आणि फॅमिलीसोबत वेळ घालवा : नातेसंबंध आपल्या मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात. ऑफिसमध्ये स्ट्रेस फ्री राहण्यासाठी काम आणि तुमचे आयुष्य यात समतोल राखणे गरजेचे आहे. ऑफिसचे काम घरी आणू नका. घरी परतल्यानंतर कुटुंबीयांसोबत अवश्य वेळ घालवा. सुट्ट्यांमध्ये मित्र आणि नातेवाईकांना भेट द्या. याने तुमचा एकाकीपणा दूर होईल. कारण एकटेपणा आपल्या आरोग्यासाठी धूम्रपान किंवा लठ्ठपणाइतकाच वाईट असू शकतो. एक लक्षात घ्या जेव्हा तुमचे मानसिक आरोग्य चांगले असते, तेव्हाच तुम्ही ऑफिसमध्ये व्यवस्थित एकाग्रतेने काम करू शकाल.

■ कामातून ब्रेक घ्या : तुमच्या मनात सतत निगेटिव्ह विचारांचा घुमजाव सुरू असेल, तर याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. अशा स्थितीत तुम्ही कामातून ब्रेक घेणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही एखादी ट्रिप प्लॅन करू शकता. पुस्तके वाचू शकता. काही मिनिटे मन शांत ठेवून तुम्ही स्वतःला रिलॅक्स करू शकता.

■ पुरेशी झोप घ्या : बिझी लाईफस्टाईलमुळे अनेकांची झोप पूर्ण होत नाही, पण अशाने तुमच्या शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. यासाठी पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा.

In आरोग्य बातमी महाराष्ट्र

Post navigation

भटक्या कुत्र्यांना खायला देणाऱ्यांनो सावधान!
उपयुक्त ज्येष्ठ नागरिक कार्ड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 8 months Ago

ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन.

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

क्रिकेटपटू, भाजपा खासदार गौतम गंभीर यांची राजकारणातून निवृत्ती जाहीर

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 6 months Ago

राष्ट्रीय छात्र सेना-NCC ची क्षमता १७ लाखांवरून २० लाखापर्यंत वाढवण्याचा सरकारचा विचार

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 3 years Ago

बॅटरीशिवाय चालणारी जगातील पहिली ई-बाईक फ्रेंच कंपनीने केली विकसित

February 2024
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
26272829  
« Jan   Mar »