Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • आरोग्य
  • बातमी
  • महाराष्ट्र

शेवग्यात दुधापेक्षा १७ पट अधिक कॅल्शियम

On 2 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

 शेवग्याच्या शेंगा, पाने ही सर्वच अतिशय आरोग्यदायी असतात. त्याबाबत वेळोवेळी अनेक प्रकारची माहितीही समोर येत असते. मात्र, शेवग्यामध्ये दुधापेक्षा तब्बल १७ पट अधिक कॅल्शियम असते, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

ऑस्टियोपेनिया आणि मुडदूस यामुळे रुग्णाचे आयुष्य खूप त्रासदायक बनते. हे सर्व आजार टाळण्यासाठी कॅल्शियमचा स्तर शरीरात चांगला असणे आवश्यक असते. दूध हा आहारातील कॅल्शियमचा सर्वात महत्त्वाचा स्रोत मानला जातो; परंतु काही लोक ते सेवन करू शकत नाहीत. काही लोकांना त्याची चव

आवडत नाही, तर काहींना अलर्जी होते. जे लोक ‘वेगन’ आहेत तेही दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ टाळतात. अशावेळी कॅल्शियमची गरज कशी भागवायची, हा प्रश्न अनेकांना पडतो. शरीराच्या प्रत्येक अवयवाला या खनिजाची गरज असली, तरी हाडांना कॅल्शियमची सर्वाधिक गरज असते.

जेव्हा आहारातून कॅल्शियम मिळत नाही, तेव्हा शरीर हाडांमधून ते शोषू लागते. शेवग्याच्या शेंगा कॅल्शियमचा चांगला स्रोत असतात. याला मोरिंगा किंवा ड्रमस्टिकसुद्धा म्हणतात. आहारतज्ज्ञांनी म्हटले आहे की, शेवग्याच्या पानांमध्ये दुधापेक्षा ४ पट जास्त कॅल्शियम असते; तर त्याच्या पावडरमध्ये ते १७ पट जास्त असते. हे वृद्धत्वविरोधी मानले जाते, म्हणून ३० नंतर या सुपरफूडचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. यामुळे हाडांचे वस्तुमान वाढू लागते म्हणजेच हाडांची जाडी नीट होते. गर्भवती महिला आणि मुलांनीदेखील शेवग्याच्या पानांचे सेवन करावे. यामध्ये लोह असते जे गर्भवती महिला आणि मुलांसाठी खूप महत्त्वाचे आहे. हे लोहाच्या कमतरतेचा धोका कमी करते आणि अशक्तपणा टाळते. शरीराला चांगले कार्य करण्यासाठी भरपूर रक्ताची आवश्यकता असते, जे यातून मिळते.

In आरोग्य बातमी महाराष्ट्र

Post navigation

6 घंटे से भी कम नींद से शॉर्ट टर्म मेमोरी को नुकसान, बातों को फिर से याद करने की क्षमता होती है बाधित
अकोल्यात शुक्रवारी महिलांसाठी रोजगार मेळावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • आरोग्य
  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 9 months Ago

 Lukewarm water | चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली : कोमट पाणी

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

पत्रकार निडर होकर कार्य करें, अदालतों का उन्हें सुरक्षित करना जरूरी: हाईकोर्ट

  • आरोग्य
  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

नीम एक लेकिन फायदे अनेक

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

महाराष्ट्रातले भाजपा आमदार राजेंद्र पटणी यांचं निधन

February 2024
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
26272829  
« Jan   Mar »