Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र

मराठा आरक्षण आंदोलनाची विशेष तपास पथकामार्फत चौकशी

On 2 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

मराठा आरक्षण आंदोलनाच्या आडून अशांतता पसरवल्याच्या आरोपांची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत केली. आकसापोटी कोणावरही कारवाई केली जाणार नाही असं सांगत विरोधकांनीही याबाबत सहकार्याची भूमिका घ्यावी असं मुख्यमंत्री म्हणाले. मराठा समाजाला सरकारनं संपूर्ण अभ्यास करून  कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आणि विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन  आरक्षण दिलं आहे त्यामुळे याबद्दल कोणीही संभ्रम निर्माण करू नये  असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

जातीय कलह निर्माण करण्याचा प्रकार खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला. कायद्याला धरून नसणाऱ्या मागण्या पूर्ण करणं शक्य नव्हतं. जरांगे प्रामाणिकपणे आंदोलन करत होते तेव्हा त्यांना पाठिंबा दिला मात्र जरांगे यांच्या मागण्या दिवसेंदिवस वाढत चालल्या असून त्यांची भाषा राजकीय झाली अशी टीका त्यांनी केली. त्यापूर्वी या  मुद्द्यावरुन विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक खडाजंगी आणि गदारोळ झाला झाली त्यामुळे कामकाज तीनदा तहकूब करावं लागलं. तसंच विरोधकांनी सभात्यागही केला. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतरही  राज्यात अशांतता आणि अराजकता पसरवली जात आहे असं सांगत  हा कट रचण्यामागचा सूत्रधार शोधून काढून याप्रकरणी गुन्हा दाखल करून एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी भाजपा गटनेते आज प्रवीण दरेकर यांनी केली. उपमुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी तसंच जरांगे यांच्या सभांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च कुठून करण्यात आला त्या आर्थिक व्यवहारांची ईडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी देखील दरेकर यांनी यावेळी केली.

In बातमी महाराष्ट्र

Post navigation

आता सडणार नाही कांदा, वर्षभर साठवून ठेवा
माय मराठीच्या प्राचीनतेचा पुरावा सापडला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

औषधे, सौंदर्यप्रसाधने, मिठाई बनविण्यासाठी चीनमध्ये दररोज हजारो गाढवांची कत्तल

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 4 years Ago

साहित्य संमेलन अध्यक्षांचे नाव ठरणार गोव्याच्या भूमीत

  • बातमी
  • महाराष्ट्र
  • विशेष लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 1 year Ago

Chhatrapati Sambhaji Maharaj  | छत्रपती संभाजीराजांच्या स्वराज्य अबाधित!

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

नागपूर ते गोवा महामार्ग ११ जिल्हे जोडणार

February 2024
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
26272829  
« Jan   Mar »