Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र

काश्मीरमधील प्राचीन मार्तंड सूर्यमंदिराचा होणार जीर्णोद्धार

On 2 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

जम्मू काश्मीर येथील आनंतनाग जिल्ह्यातील 8 व्या शतकातील मार्तंड सूर्यमंदिराचा जीर्णोद्धार आणि संवर्धन करण्यात येणार आहे. हे मंदिर भारतातील सर्वांत जुने सूर्यमंदिर आहे. सम्राट ललितादित्य मुक्तपाद यांनी हे मंदिर उभारले होते. त्यानंतर मध्य युगात मुस्लिम शासक सुलतान सिंकदर शहा मिर याच्या आदेशावरून हे मंदिर उद्धवस्त करण्यात आले होते. या मंदिराचे संरक्षण, संवर्धन आणि जीर्णोद्धार करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव आणि सांस्कृतिक विभागाचे अधिकारी यांच्यात आज मीटिंग होणार आहे, असे लाइव्ह मिंटच्या बातमीत म्हटले आहे. “मुख्य सचिव आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी ही मीटिंग घ्यावी. यामध्ये या मंदिराचे संरक्षण, संवर्धन आणि जीर्णोद्धार यावर चर्चा व्हावी. तसेच सम्राट ललितादित्य यांचा पुतळा मंदिर परिसरात उभारण्यावर चर्चा व्हावी,” असे या बैठकी संदर्भातील पत्रात म्हटले आहे.

7 व्या शतकानंतर काश्मीरवर करकोटा राजघराण्याची सत्ता होती. या घराण्यातील शासक सम्राट ललितादित्य यांनी 8 व्या शतकात काश्मीरमध्ये सूर्याचे भव्य मंदिर बांधले होते. हे वास्तू सध्या पुरातत्त्व खात्याने संरक्षित केली आहे. मध्य युगात सुलतान सिकंदर शाह मिर याने हे मंदिर उद्धवस्त केले. राजतरंगिणी या ऐतिहासिक काव्यग्रंथात करकोट या राजघराण्यासंदर्भात बरेच संदर्भ आहेत. गेल्या महिन्यात जम्म काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या मंदिराला भेट दिली होती आणि येथे आयोजित यज्ञात सहभाग घेतला होता. त्यानंतर मंदिराच्या जीर्णोद्धारासंदर्भात विचार सुरू झाले.

In बातमी महाराष्ट्र

Post navigation

वऱ्हाडी कथा : पंगत
त्वचाविकार – खरूज कारण आणि उपचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 10 months Ago

Independence Day 2025 : सिंधू करार एकतर्फी…; लाल किल्ल्यावरुन PM मोदी काय म्हणाले?

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 4 years Ago

तरुणाई फाउंडेशन राज्यस्तरीय विविध क्षेत्री गुणिजन गौरव पुरस्कार सोहळा २०२२ करिता नामांकन प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 4 years Ago

पुरस्काराने कार्य करण्याची प्रेरणा मिळते; आ. अमोल मिटकरी

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 3 years Ago

मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ना. गिरीष महाजन

April 2024
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Mar   May »