Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र

९८ वे साहित्य संमेलन नवी दिल्लीत?

On 2 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

अ. भा. मराठी साहित्य महामंडळ निवड समितीकडून स्थळाची पाहणी

नवी दिल्ली: अखिल  भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९८ व्या मराठी संमेलनासाठी स्थळ निवड समितीने गुरुवार, १ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथील नियोजित स्थळाची पाहणी केली. देशाची राजधानी नवी दिल्ली येथील सरहद्द संस्थेतर्फे संमेलनासाठी निमंत्रण आल्याने महामंडळ सदस्यांनी इचलकरंजी येथे भेट दिल्यानंतर सरहद्द संस्थेच्या प्रस्तावाप्रमाणे गुरुवारी शहरातील इंडिया इंटरनॅशनल संस्था सभागृह तसेच तालकटोरा इनडोअर स्टेडियम येथे भेट दिली.

फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात संमेलन घेतल्यास उत्तम वातावरण असेल, असे सरहद्द संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांनी सांगितले. कमीत कमी चार ते पाच हजार साहित्यप्रेमी हजर राहतील, असा अंदाज व्यक्त केला. महाराष्ट्र सदन, जैन भवन, महाराष्ट्र भवन वेस्टर्न कोर्ट, संत नामदेव भवन येथे सुमारे दीड हजार लोकांना वरील ठिकाणी राहण्याची सोय करता येणार असल्याचे सांगितले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व स्थळे महामंडळ सदस्यांना दाखवली. त्यानंतर एक बैठक घेण्यात आली. यावेळी महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. उषा तांबे, उपाध्यक्ष गुरय्या रे. स्वामी, कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, सदस्य प्रदीप दाते, डॉ. रामचंद्र काळुंखे, डॉ. सुनीता राजे पवार निमंत्रक संस्थेतर्फे संजय नहार, विजय नाईक, अतुल जैन, भारताचे माजी उच्चायुक्त व राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे, शैलेश पगारिया, लेशपाल जवळगे, आनंद पाटील, श्रीराम जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यानंतर मुंबई येथील वांद्रा लायब्ररी यांनी दिलेल्या निमंत्रणानुसार शनिवारी पाहणी करण्यात येणार आहे.

In बातमी महाराष्ट्र

Post navigation

अन्नधान्यातील भेसळ शोधण्यासाठी पतंजलीचे नवीन संशोधन
मिटकरी गाडी हल्ला प्रकरण : मुख्य सूत्रधार दुनबळे अद्याप फरार अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 6 months Ago

चीनची क्रांतिकारक झेप: समुद्राच्या खाऱ्या पाण्यातून गोडे पाणी व ग्रीन हायड्रोजन उत्पादन

  • आरोग्य
  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

कर्करोगाच्या पेशी रोगप्रतिकारक शक्तीला ‘कसा’ देतात चकवा ?

  • बातमी
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

धनादेश होणार काही तासांत क्लीअर; रिझर्व्ह बँकेची मोठी घोषणा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 4 years Ago

हरित फटाके म्हणजे काय?

August 2024
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Jul   Sep »