Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • आरोग्य
  • बातमी
  • महाराष्ट्र

Diabetes treatment | मधुमेहावरील उपचारांसाठी शोधले नवीन प्रोटीन

On 2 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

जगभरासह देशात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रभावी उपचारासाठी अनेक संशोधन प्रकल्प सुरू आहेत. आता संशोधकांनी आयएल-३५ या विशिष्ट प्रोटीनचा शोध लावला आहे. हे प्रोटीन मधुमेहावरील उपचारांसाठी एक नवीन पर्याय ठरू शकतो. (Institute for Advanced Study in Science and Technology)

हे प्रोटीन जळजळ निर्माण करणारी रसायने तयार करणाऱ्या पेशी कमी करते. यामुळे स्वादुपिंडाच्या पेशींचा प्रभाव कमी होतो. ही प्रक्रिया टाईप १ मधुमेह आणि ऑटोइम्यून मधुमेहात सकारात्मक, महत्त्वपूर्ण योगदान देते. केंद्र सरकारच्या अखत्यारितील ‘इन्स्टिट्यूट फॉर अॅडव्हान्स्ड स्टडी इन सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी’च्या संशोधकांनी हा शोध लावला आहे. आयएल-३५ हे प्रोटीन रोगप्रतिकारक शक्तीचे संरक्षण करते. मधुमेहासाठी एक नवीन उपचार पर्यायदेखील उपलब्ध करते. ही संपूर्ण यंत्रणा समजून घेण्यासाठी आणि आयएल-३५ आधारित उपचाराच्या पुढील क्लिनिकल चाचण्या करणे आवश्यक आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, विकसनशील देशांतील मुले आणि किशोरवयीन मुलांभोवतीचा मधुमेहाचा विळखा घट्ट होत आहे. अशा परिस्थितीत मधुमेहावर प्रभावी उपचार करणे ही काळाजी गरज आहे. (Institute for Advanced Study in Science and Technology) संशोधकांच्या मते आयएल-३५ टाइप १ आणि ऑटोइम्यून मधुमेह टाळण्यास मदत करते. आयएल-३५ने स्वादुपिंडाच्या बीटा पेशींना रोगप्रतिकारक पेशींवर परिणाम करण्यापासून रोखले. याव्यतिरिक्त आयएल-३५ने विशिष्ट रोगप्रतिकारक पेशी कमी केल्या, ज्यामुळे दाहक रसायने तयार होतात. हे स्वादुपिंडाच्या पेशींचे बिघडलेले कार्य कमी करतात. जे टाइप १ मधुमेह आणि ऑटोइम्यून मधुमेह मेलिटसमध्ये मोठे योगदान देतात.

In आरोग्य बातमी महाराष्ट्र

Post navigation

Stuck in the Throat | घशात चॉकलेट अडकल्यास…
Toilet | टॉयलेटमध्ये १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसणे धोकादायक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
VARHADVRUTT WEB TEAM
On 4 years Ago

महात्मा गांधीजींची ती सायकल आता गांधीतीर्थमध्ये

  • बातमी
  • महाराष्ट्र
  • विशेष लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

Usha Uthup | मर्दानी आवाजाची पॉप सम्राज्ञी उषा उत्थुप

  • आरोग्य
  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

हृदयविकाराचा जेवणाची वेळ आणि धोका यांच्यात जवळचा संबंध

  • आरोग्य
  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

नीम एक लेकिन फायदे अनेक

November 2024
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  
« Oct   Dec »