Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र

भटक्या श्वानांना खायला घालण्यापासून रहिवाशाला रोखू नये

On 1 year Ago
VARHADVRUTT WEB TEAM

उच्च न्यायालयाचे गृहनिर्माण संस्थेला आदेश

भटक्या श्वानांना खायला घालणाऱ्या महिलेच्या गृहसेवकाला सोसायटीच्या आवारात प्रवेश करण्यापासून गृहनिर्माण संस्था रोखू शकत नाही, असे करणे त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केल्यासारखे आहे, निरीक्षण उच्च न्यायालयाने नुकतेच नोंदवले.

गृहनिर्माण संस्थेने प्रतिवादी महिलेच्या गृहसेवकाला गृहनिर्माण संस्थेच्या आवारात प्रवेश करण्यापासून रोखून तिच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केले आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, प्रतिवादी लीला वर्मा यांच्या गृहसेवकाला गृहनिर्माण संस्थेच्या आवारात येऊन श्वानांना खाऊ घालण्याचे नियमित कर्तव्य बजावण्यापासून रोखू नये, असे आदेशही न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्या सोसायटीच्या समितीला दिले. भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेले मूलभूत आणि मानवी अधिकारांचे कोणत्याही कारणांमुळे उल्लंघन होणार नाही याची खात्री करणे न्यायव्यवस्थेचे कर्तव्य असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

प्रतिवादी निव्वळ गृहनिर्माण संस्थेच्या आवारात भटक्या श्वानांना खाऊ घालतात, म्हणून याचिकाकर्ते त्यांच्यासह इमारतींमधील इतर रहिवाशांच्या मूलभूत हक्कांचा अनादर अथवा उल्लंघन करू शकत नाही, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले. भटक्या श्वानांना खायला घालण्याच्या किंवा त्याच्यासाठी निश्चित केलेल्या जागेच्या मुद्दयावर गृहनिर्माण संस्थेला कोणतीही तक्रार असल्यास त्यांना संबंधित प्राधिकरण अथवा यंत्रणेकडे म्हणणे मांडून योग्य कार्यवाहीच्या मागणीचा अधिकार आहे. तसेच, या समस्येवर संबंधित यंत्रणा तोडगा काढू शकेल. त्याचप्रमाणे, प्राण्यांच्या हक्कांच्या संरक्षणाबाबतचा कायदा आणून त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले. सी वुड्स इस्टेट येथील एका गृहनिर्माण संस्थेत राहणाऱ्या लीला वर्मा यांच्या गृहसेवक भटक्या श्वानांना सोसायटीच्या आवारात खाणे घालत असल्याने तिला सोसायटीत प्रवेश नाकारण्यात आला. सोसायटीच्या या निर्णयामुळे आपल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा दावा वर्मा यांनी केला होता. उल्लेखनीय बाब म्हणजे एप्रिल २०२३ मध्ये, न्या. कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील अन्य एका खंडपीठाने सोसायटीतील रहिवाशांवर रस्त्यावरील श्वानांसाठी, विशेषतः ऐन उन्हाळ्यात योग्य पिण्याची सुविधा उपलब्ध करणे बंधनकारक असल्याचे तसेच भटक्या श्वानांना मारहाण करणे क्रूरता असल्याचे आदेशात म्हटले होते.

In बातमी महाराष्ट्र

Post navigation

अन्नावरच्या सरासरी खर्चाचे गणित काय सांगते?
मोरोक्को मारणार ३० लाख भटके श्वान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 10 months Ago

‘गणेशोत्सव’ आता महाराष्ट्राचा ‘राज्य महोत्सव’

  • बातमी
  • महाराष्ट्र
  • विशेष लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

धर्म आणि लेखकाचा धर्म

  • बातमी
  • महाराष्ट्र
  • लोकप्रिय लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

जाणून घ्या पुढील वर्ल्डकपबद्दल सर्व माहिती

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

ज्येष्ठ कवी नारायण अंधारे यांना मानद डॉक्टरेट

January 2025
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Dec   Feb »