Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • आरोग्य
  • बातमी
  • महाराष्ट्र

Near Death Experience | मृत्यूच्याक्षणी डोळ्यांसमोर येतो स्वतःचा जीवनपट !

On 1 year Ago
VARHADVRUTT WEB TEAM

संशोधनातून उघड झाले सत्य

मृत्यूवेळी अनेकांसमोर आपलाच जीवनपट एखाद्या चित्रपटातील फ्लॅशबॅकप्रमाणे समोर उभा राहतो, असे म्हटले जाते. आता विज्ञानानेही या मुद्याला अधोरेखित केले आहे. मृत्यूवेळी माणसाच्या मेंदूत काय हालचाली घडतात, याबाबत अनेक दशकांपासून संशोधन सुरू आहे. आता प्रथमच एका मानवी मेंदूमधील मृत्यूच्या वेळेच्या हालचालींना रेकॉर्ड करण्यात यश आले आहे. त्यामधून हे दिसून आले की, मृत्यूपूर्वी लोक एक ‘लाईफ रिव्ह्यू’चा अनुभव करतात.

लहानपणापासून घडलेल्या अनेक घटना त्यांना त्यावेळी आठवतात. हे रेकॉर्डिंग ८७ वर्षे वयाच्या एका रुग्णाच्या मेंदूचे आहे. रुग्णावर अपस्मारासाठीचे उपचार सुरू होते. मात्र, त्यावेळी त्याचा कार्डियाक अरेस्टने मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी डॉक्टरांनी त्याच्या मेंदूच्या हालचाली मॉनिटर करण्यासाठी एक उपकरण लावले होते. उपचारादरम्यानच रुग्णाची हृदयक्रिया बंद पडली आणि त्याचा मृत्यू झाला. मात्र, या काळात सुमारे ९०० सेकंदांपर्यंत मेंदूमधील हालचाली पा उपकरणाने रेकॉर्ड केल्या. त्यांना आढळले की, मेंदुवा जो भाग आठवणींशी निगडित असतो, तो मृत्यूच्या क्षणीही सक्रिय होता! या शोधाचे प्रमुख वैज्ञानिक डॉ. अजमल जेममार यांनी सांगितले की, या ब्रेन वेव्ज म्हणजेच मेंदूतील लहरी आठवणी पुन्हा ताज्या केल्याचे दर्शवतात. त्यामधून असे दिसते की, मृत्यूवेळी मेंदू कदाचित आयुष्यामधील महत्त्वाच्या घटनांचे शेवटचे अवलोकन करीत होता! “निअर डेथ एक्सपिरिअन्स’ मध्येही अनेक लोकांनी डोळ्यांसमोर आपला जीवनपट उभा राहिला होता, असे जीव वाचल्यानंतरच्या मुलाखतींमध्ये सांगितले होते. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, मेंदूमधील अनेक घडामोडी, जसे गामा वेच्त्र, मेंदूच्या उच्च जाणिवेच्या कार्याशी निगडित असतात. त्यामध्ये आठवणींची पुनर्प्राप्ती आणि जीवनाच्या महत्त्वपूर्ण घटनांची समीक्षा समाविष्ट असू शकते. मृत्यूच्या वेळी मेंदू एका निश्चित प्रक्रियातून जाऊ शकतो, जी जीवनाच्या शेवटच्या क्षणांमध्ये आपल्या शारीरिक व मानसिक बदलांना नियंत्रित करू शकते.

In आरोग्य बातमी महाराष्ट्र

Post navigation

उद्योगांना त्रास देणाऱ्या आणि ब्लॅकमेल करणाऱ्यांविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचे निर्देश
‘विदर्भ ग्लोबल स्किल युनिव्हर्सिटी’साठी १०० एकर जागा देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
  • विशेष लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

धर्म आणि लेखकाचा धर्म

  • आरोग्य
  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

नीम एक लेकिन फायदे अनेक

  • बातमी
  • महाराष्ट्र
  • विशेष लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

हर रंग का है एक प्रसंग

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

क्रिकेटपटू, भाजपा खासदार गौतम गंभीर यांची राजकारणातून निवृत्ती जाहीर

February 2025
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
2425262728  
« Jan   Mar »