Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र

Abhijat Marathi Bhasha Sanman Din: | ३ ऑक्टोबर अभिजात मराठी भाषा सन्मान दिन

On 1 year Ago
VARHADVRUTT WEB TEAM

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता येथून पुढे ३ ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ म्हणून साजरा होणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात केली. राज्याचा अर्थसंकल्प मांडताना ते बोलत होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. ‘भावफुलांना पायी उधळून आयुष्याचा कापूर जाळून तुझे सारखे करीन पूजन, गीत तुझे मी आई गाईन शब्दोशब्दी अमृत ओतून’ अशा शब्दांत अजित पवार यांनी मराठी भाषेचा गौरव करीत माय मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून दिल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले. आपल्या माय मराठीस केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ३ ऑक्टोबर, २०२४ रोजी झालेल्या बैठकीत अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्यातील जनतेच्या आणि जगभरातील मराठी भाषिकांच्या वतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक आभार मानतो असेही अजित पवार यावेळी म्हणाले. यापुढे दरवर्षी ३ ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन, तर ३ ते ९ ऑक्टोबरदरम्यान ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा करण्यात येईल. मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर येथे अभिजात मराठी भाषेच्या संशोधन व अध्ययनासाठी उच्च दर्जाचे संशोधन केंद्र तसेच अनुवाद अकादमी स्थापित करण्यात येणार आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून अभिजात मराठी भाषाविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मराठी भाषेच्या संशोधनातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कार सुरू करण्यात येणार आहेत अशीही माहिती यावेळी अजित पवार यांनी दिली. #ClassyMarathi #MarathiLanguage #HonorDay #CelebrateMarathi

In बातमी महाराष्ट्र

Post navigation

Chhatrapati Sambhaji Maharaj  | छत्रपती संभाजीराजांच्या स्वराज्य अबाधित!
रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत भोंगे बंद ठेवले पाहिजेत – देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 4 years Ago

डिजिटल मीडिया परिषदेच्याही सर्व पत्रकारांनी अधिवेशनात सहभागी व्हावे – वाघमारे

  • बातमी
  • लोकप्रिय लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 4 years Ago

जगभरात हिंदूंविरोधात राग का?

  • बातमी
  • महाराष्ट्र
  • विशेष लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

बॉलीवूडला बकरीच्या दुधापासून बनवलेल्या साबणाचे लागले वेड

  • बातमी
  • महाराष्ट्र
  • विशेष लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

कागज की कहानी

March 2025
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Feb   Apr »