Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • विशेष लेख

ISBN ची कथा

On 1 year Ago
VARHADVRUTT WEB TEAM

साधारण १४४० मध्ये गोल्डस्मिथ जोहांस गुटनबर्ग या वल्लीनं नव्या तंत्राच्या, वेगवान छापखान्याचा ढाचा बनवला आणि छपाईच्या क्षेत्रात खऱ्या अर्थानं क्रांती झाली. पुस्तकं त्याही आधीपासून अस्तित्वात असली तरी पुस्तकांचा व्यवसाय या घटनेनेच सुरू झाला असे ठामपणे म्हणता येईल. प्रचंड मोठ्या प्रमाणावर छापलं आणि अर्थातच विकलं गेलेलं पहिलं पुस्तक कुठलं या प्रश्नाचं उत्तर म्हणजे या गुटनबर्गला अमर करणारं नाव आहे – B42 अर्थातच गुटनबर्ग बायबल. इथून पुस्तकांचा खरा प्रवास सुरू झाला. १४४० च्या सुमारास छापखाना अस्तित्वात आला असला तरी पुस्तकांचं दुकान उघडायला काही काळ गेला. आता ज्ञात असलेलं सगळ्यात जुनं पुस्तकाचं दुकान Librairie nouvelle d Orl]ans (सध्याचं नाव New Orleans Bookstore) हे ओरलेयन्समध्ये १५४५ मध्ये सुरू झालं. जवळपास १०० वर्षांनी, दुसरं Livraria Bertrand हे ब्रिस्बन, पोर्तुगालमध्ये १७३२ ला सुरू झालं. दोन्ही दुकानं आजही सुरू आहेत हे विशेष! याआधी काही दुकानं सुरू झाली असावीत, पण त्याबद्दल काही माहिती सापडत नाही. याचदरम्यान १७९२ मध्ये हेन्री वॉल्टन स्मिथ आणि त्याची बायको ॲन यांनी लंडनमध्ये छोटं वर्तमानपत्र आणि मोजकी पुस्तकं मिळतील असं दुकान टाकलं. या W. H. Smithveb मुळे सबंध जगातला पुस्तक व्यवहार बदलला; त्याचीच ही गोष्ट.

हेन्री पुढे लगेचच वारला, ॲननं अजून एक भागीदार घेऊन १८१२ पर्यंत दुकान सांभाळलं आणि ती ही १८१६ मध्ये गेली. त्यांचा मुलगा विलियम सीनियरनं दुकानाचं नाव बदलून स्वतःच्या नावावर ठेवलं – W. H. Smith. त्याने १८४६ पर्यंत धंदा सांभाळला. विलियम जुनियरनं १८४८ ला धंदा ताब्यात घेतला आणि नाव ठेवलं W. H. Smith & Sons. तिथून १९९२ पर्यंत स्मिथ फॅमिली या कंपनीशी निगडित राहिली. आज ही कंपनी जगातली सगळ्यात मोठी रिटेल स्टेशनरी कंपनी आहे, फायद्यात आहे हे विशेष!

गोष्ट आहे १९६५ मधली कंपनीचा व्याप आणि आवाका फार वाढला होता. देशभरात बहुतांश ठिकाणी त्यांची दुकानं होती. यानंतर पुढे पुस्तकांची संख्या वाढली तशी त्यांना हिशेब ठेवणं, स्टॉक मोजणं कठीण जाऊ लागलं. अशातच त्यांनी जाहीर केलं की, १९६७ पासून ते पुस्तकांच्या व्यवस्थापनासाठी एक प्रमाण प्रणाली व्यवस्था वापरायला सुरू करतील. या जाहीरनाम्यानं पुस्तक क्षेत्रात उत्सुकता निर्माण झाली. याच सुमारास इंग्लंडमधला अजून एक प्रकाशक विली (Wiley) त्याच्या गोदामासाठी तशीच एक प्रणाली शोधत होता. तर तिसरीकडे W. H. Smith ची घोषणा ऐकून प्रकाशक संघ युनायटेड किंगडम आणि आयर्लंडमधल्या पुस्तकांसाठी एक प्रणाली बनवण्याचा विचार करू लागले. या तिन्ही कामांसाठी एकाच माणसाकडे अनेकांनी बोट दाखवलं, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधले संख्याशास्त्र आणि संगणकीय अभ्यास या विषयाचे प्राध्यापक गॉर्डन फॉस्टर यांच्याकडे. अर्थातच त्यांनी हे काम स्वीकारलं. फॉस्टर हेदेखील एक रोचक प्रकरण आहे. गरीब गॅरेज मेकॅनिकच्या घरात जन्मलेले फॉस्टर बेलफास्ट युनिवर्सिटीमध्ये दाखल झाले तेव्हा त्यांना काय करावं हे कळत नव्हतं. काही काळ मेडिसीनमध्ये काम करून पुढे ते कला शाखेत आले आणि गणितातून पदवीधर झाले. लगेच त्यांना MI6 ने नोकरी दिली. तिथे ते प्रसिद्ध गणितज्ञ आणि आजच्या संगणकाचे जनक ॲलन ट्यूरिंगच्या हाताखाली काम करू लागले. पुढे १९४८ साली युद्ध संपल्यावर त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आणि ते संभाव्यता या गणिती संकल्पनेवर संशोधन करून प्रोफेसर झाले. काही वर्षांनी त्यांची भेट पुन्हा अॅ लन ट्यूरिंगशी झाली. याच काळात त्यांना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सनं प्राध्यापक म्हणून रुजू करून घेतलं आणि त्यांनी ब्रिटिश सरकारसाठी जुगारावर नियंत्रण आणणारी एक व्यवस्था निर्माण केली. त्याच्याच आधारावर त्यांच्या OR अर्थात ऑपरेशन मॅनेजमेंटमध्ये आजच्या फेमस फॉ स्टर थेरमचा जन्म झाला. अशा विद्वान माणसाकडे हे पुस्तकांसाठी नवीन प्रणाली बनवण्याचं काम आलं. या प्रणाली बनवण्यात एकच अडचण होती ती म्हणजे त्याकाळी प्रचलित असलेल्या सगळ्या माहितीचा वापर यात व्हायला हवा अशी ती बनवून घेणाऱ्या संस्थांची मागणी होती. काम कठीण होतं, पण फॉस्टर यांनी वर्षभरात ते सोडवलं आणि त्याला नाव दिलं SBN अर्थात Standard Book Number. हा एक नऊ अंकी क्रमांक असून यात प्रकाशक, पुस्तक, विभाग इत्यादींना प्रत्येकी विशिष्ट संख्येचा कोड दिला गेला. ही व्यवस्था १९७० पर्यंत चालली. जी पुढे अमेरिकेने १९६८ साली कॉपी करून तिकडेही राबवली. १९६८पासून ISO (International Organization for Standardization) चे या उद्योगाकडे लक्ष होतेच. त्यांनी १९६९ मध्ये परत फॉस्टर यांनाच पाचारण करून ही प्रणाली जागतिक वापरासाठी कशी सज्ज करता येईल यावर काम करण्यास सुचवलं आणि १९७० सालापासून ९ अंकांचा SBN एक अंक शून्य लावून ISBN DeLee&le International Standard Book Number म्हणून जागतिक पातळीवर वापरला जाऊ लागला. १९७२, १९९० आणि २००७ अशा तीन सुधारणा आजपर्यंत या प्रणालीत झालेल्या आहेत. पहिल्यांदा १० आकड्यांचा असणारा हा क्रमांक १ जानेवारी २००७ पासून १३ आकडी झाला आहे आणि त्यासोबत एक बार कोडदेखील दिला जाऊ लागला आहे. GS1 या प्रसिद्ध बारकोड कंपनीने ही नवीन व्यवस्था बनवण्यात मोलाचं सहकार्य केलं आहे. आपण जेव्हा पुस्तक खरेदी करतो किंवा बघतो तेव्हा मलपृष्ठावर असलेले हे १३ आकडे आणि एक बारकोड आपलं लक्ष वेधून घेत असले तरी त्यातून आपल्याला काहीही कळत नाही, कळणार नाही हे आपण मान्य करून पुढे जात असतो. त्याची गरज, इतिहास आणि आजचं रूप याबद्दल आपल्याला काही ठाऊक नसतं. आज आपल्या हाताशी असणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे, प्रणालीमागे, व्यवस्थेमागे काहीतरी कथा असतेच. तशीच या ISBN ची ही कथा. समजा W. H. Smith काय किंवा Wiley किंवा ISO या कुणालाच वाढत जाणाऱ्या पुस्तकांच्या व्यवस्थापनाचा प्रश्न पडला नसता तर आज आपण अगदी एका क्लिकवर पुस्तकं ज्या सहजतेने शोधतो आणि मागवतो, ती सहजता आपल्या आयुष्यात आली असती का? विचार करायला हरकत नाही.

■ अनिरुद्ध प्रभू (लेखक पुस्तक व्यवसायक्षेत्रात कार्यरत आहेत.)

In बातमी महाराष्ट्र विशेष लेख

Post navigation

 हिंदूंना धोका : प्रवीण तोगडिया
यवतमाळला ३ हजार वर्षांपूर्वीच्या वसाहतीचा शोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
  • विशेष लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

या व्यायामाने व्हर्टिगोमुळे होणारी चक्कर दूर करा

  • बातमी
  • महाराष्ट्र
  • विशेष लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 9 months Ago

Japan’s Daruma doll : जपानच्या दारुमा बाहुलीचा भारताशी संबंध आहे, पंतप्रधान मोदींना दिलेल्या या भेटीमागे आहे एक रंजक कथा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

जुने मतदार ओळखपत्र असल्यास नव्याने काढा!

  • बातमी
  • महाराष्ट्र
  • विशेष लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 3 years Ago

मृत्यूपत्राचे महत्व !

April 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Mar   May »