Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र

Maratha Reservation :  मराठ्यांच्या मागण्या मान्य

On 9 months Ago
VARHADVRUTT WEB TEAM

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाला मोठं यश मिळालं असून मराठा समितीने हैदराबाद गॅझेट मान्य असल्याचं सांगितलं. त्यानुसार गावातील, नात्यातील, कुळातील लोकांना चौकशी करुन कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं उपसमितीने मनोज जरांगे यांच्यासमोर मान्य केलं. तसेच सातारा गॅझेटच्या मागणीवर जलदगतीने निर्णय घेणार असल्याचंही उपसमितीने मान्य केलं.

मनोज जरांगेंनी आझाद मैदानातील उपोषणाची सांगता केल्याचं जाहीर केलं. यावेळी त्यांनी राज्य सरकारचे आभार मानले. मराठा आणि कुणबी एकच असल्याची मागणी जरांगे यांनी केली होती. त्यावर ही प्रक्रिया किचकट आहे, त्यासाठी एक-दोन महिन्यांचा वेळ द्यावा अशी मागणी उपसमितीने केली आहे. 

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आठ मागण्या केल्या होत्या. त्यावर मराठा उपसमितीकडून सहा मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. हैदराबादच्या गॅझेटची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच उपसमितीने मसुद्यात ज्या गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत त्यावर तातडीने जीआर काढण्यात येणार असल्याचा शब्द उपसमितीने दिला आहे. 

Maratha Reservation

उपसमितीने मागण्या मान्य केल्यानंतर त्याचा तातडीने जीआर काढावा, जीआर काढल्यानंतर एका तासात मुंबई रिकामी करतो असं मनोज जरांगे म्हणाले. मराठ्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर आंदोलकांनी एकच जल्लोष केला.

In बातमी महाराष्ट्र

Post navigation

Manoj Jarange | ‘माझ्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मी मुंबई सोडणार नाही’ – मनोज जरांगे पाटील
The Bengal Files|… जर हिंदूंच्या वेदना दाखवणे गुन्हा असेल तर मी दोषी आहे : विवेक रंजन अग्निहोत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
  • विशेष लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

हर रंग का है एक प्रसंग

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 3 years Ago

महाराष्ट्र सरकारने २०२३ च्या सार्वजनिक सुट्ट्यांचे पत्रक केले जारी

  • आरोग्य
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 9 months Ago

जर तुम्ही चवीसाठी जास्त साखरेचे सेवन करत असाल तर …

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 3 years Ago

भारतीय बोली भाषांवर गंडांतर

September 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Aug   Oct »