Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र

घटस्थापनेचा शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि नवरात्रीचे संपूर्ण वेळापत्रक !

On 9 months Ago
VARHADVRUTT WEB TEAM

गणेशोत्सवानंतर काही दिवसांतच भारतात साजरा होणारा आणखी एक महत्वाचा आणि भक्तिभावाने साजरा केला जाणारा सण म्हणजे शारदीय नवरात्रोत्सव. देवीच्या नऊ रूपांची आराधना आणि उपासना करण्याचा हा काळ भक्तांसाठी अत्यंत मंगलमय मानला जातो. शारदीय नवरात्र या वर्षी सोमवार २२ सप्टेंबर २०२५ , पासून सुरू होत आहे. या दिवशी घटस्थापना होणार असून, यामध्ये विशिष्ट शुभ मुहूर्तावर देवीची स्थापना आणि पूजन केल्यास विशेष फलप्राप्ती होते.

घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

शुभ मुहूर्त सुरू: २२ सप्टेंबर २०२५, सोमवार, मध्यरात्र ०१:२३ वाजता

शुभ मुहूर्त समाप्त: २३ सप्टेंबर २०२५, मंगळवार, दुपारी २:५५ वाजता

घटस्थापना पूजा विधी

पूजा करण्यापूर्वी घर आणि मंदिर स्वच्छ करा.

गंगाजल शिंपडून जागा शुद्ध करा.

ईशान्य किंवा उत्तर दिशेला एक स्वच्छ कपडा अंथरून देवीची मूर्ती/प्रतिमा स्थापन करा.

घट किंवा कलश स्थापना:

मातीच्या भांड्यात ज्वारी किंवा बार्लीचे धान्य पेरा.

तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी, गंगाजल, सुपारी, नाणे, अक्षता ठेवा.

कलशावर नारळ ठेवून लाल चुनरी बांधा.

कुंकवाने स्वस्तिक बनवा आणि धागा बांधा.

पूजा आणि आराधना:

देवीला फळे, मिठाई, सुपारी, अक्षता अर्पण करा.

दुर्गा सप्तशती किंवा नवरात्र स्तोत्रचे पठण करा.

शेवटी आरती करून प्रसाद वाटावा.

दिवसतारीखवारदेवीचे रूपशुभ रंग
दिवस १ २२ सप्टेंबर सोमवार    शैलपुत्री पांढरा
दिवस  २२३ सप्टेंबर  मंगळवार  ब्रह्मचारिणीलाल
दिवस  ३२४ सप्टेंबर बुधवार      चंद्रघंटा निळा
दिवस  ४२५ सप्टेंबर गुरुवार      कुष्मांडा पिवळा
दिवस  ५२६ सप्टेंबर शुक्रवार    स्कंदमाताहिरवा
दिवस  ६२७ सप्टेंबर शनिवार    कात्यायनीराखाडी
दिवस  ७२८ सप्टेंबर रविवार      जगदंबातांबडा
दिवस ८२९ सप्टेंबर सोमवार    महागौरी  जांभळा
दिवस ९३० सप्टेंबर मंगळवार सिद्धीदात्री गुलाबी

२ ऑक्टोबर २०२५ रोजी दसरा आहे , या दिवशी नवमी हवन, दुर्गा विसर्जन, शस्त्रपूजा केली जाते .

नवरात्रीत दररोज देवीच्या वेगवेगळ्या रूपाची पूजा करून तिचा आशीर्वाद घेणे अत्यंत शुभ मानले जाते. दररोजच्या शुभ रंगानुसार वस्त्र परिधान केल्यास सौभाग्य, आरोग्य आणि सुखशांती प्राप्त होते.

In बातमी महाराष्ट्र

Post navigation

Nepal’s Gen Z Protests | नेपाळमधील तरुणांना ‘नेपोकिड्स’ विरुद्ध राग
99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • लोकप्रिय लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 4 years Ago

मुलांमध्ये पुस्तके वाचण्याची सवय कशी लावावी?

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 4 years Ago

लवकरच प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल रुपया लॉन्च होणार, पुढच्या वर्षी येणार व्यवहारात -आरबीआयची माहिती

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

पंचांगांच्या एकरूपतेवर एकत्र काम करणार

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

तांत्रिकदृष्ट्या मानवांपेक्षा उपकरणांबद्दल कावळे असतात हुशार

September 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Aug   Oct »