Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र

प्रत्येक ३० वर्षात गोंगाटात दुप्पट वाढ वाढत्या गोंगाटामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका

On 4 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क

सर्व प्रकारच्या प्रदूषणाचा मानवी आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो हे अनेक वेळा सिद्ध झालेले आहे. आता ध्वनिप्रदूषणाबाबत एक नवीन माहिती समोर आली असून दर तीस वर्षांमध्ये गोंगाट्याचे प्रमाण दुप्पट होत असून त्याचा थेट परिणाम म्हणून हृदयविकार आणि स्ट्रोक या विकारांचा धोका जास्त वाढला आहे.

ड्युक युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल स्कूल लंडनमधील काही संशोधकांनी करोनाचा प्रभाव संपल्यानंतरच्या कालावधीमध्ये ध्वनिप्रदूषणाच्या परिस्थितीवर संशोधन केले असता त्यांना ही गोष्ट लक्षात आली. करोनावर आता नियंत्रण मिळवले असल्याने सर्व व्यवहार सामान्य झाले आहेत. सामान्य नागरिकांच्या रोजच्या टीव्ही पाण्याच्या सवयीपासून इतर सर्व गोष्टी पूर्वीप्रमाणेच होऊ लागल्या आहेत. त्याचाही परिणाम ध्वनिप्रदूषण वाढण्यावर झाला. गेल्या तीस वर्षांच्या कालावधीमध्ये रुग्णवाहिका किंवा पोलिस यंत्रणांचे जे सायरन आहेत त्यांच्या आवाजामध्येही दुप्पट वाढ झाल्याचे अभ्यासात म्हणण्यात आले आहे. शांत वातावरण आणि शांत मानसिकता मानवी प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त असून अशा वातावरणामध्ये चांगल्या गोष्टी घडू शकतात, तर गोंगाटयुक्त विरोधी वातावरणामध्ये हृदयविकार किंवा स्ट्रोकसारखे आजार जडण्याचा धोका सर्वाधिक असतो, असेही या संशोधनात सांगण्यात आले आहे. मेडिकल स्कूलमधील प्रोफेसर ईमके कस्टरे यांनी हे संशोधन केले असून सामान्य नागरिकांनी गोंगाटापासून दूर राहणेच पसंत करावे, असे त्यांनी म्हटले आहे.

In बातमी महाराष्ट्र

Post navigation

पत्रकार लहान असो की मोठा त्यांच्या आवाजाची दखल शासनाने घेतली पाहिजे …. जेष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे
पत्रकार कल्याण योजनांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापित करावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 9 months Ago

पाकिस्तानच्या राष्ट्रगीताऐवजी जलेबी बेबी कोणी वाजवले?

  • बातमी
  • महाराष्ट्र
  • विशेष लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

वाचन

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 9 months Ago

Sharada Bhawani Temple | काश्मीरच्या बडगाममध्ये ३५ वर्षांनी पुन्हा उघडले शारदा भवानी मंदिर

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 5 months Ago

तपोवनातील वृक्षतोडीला मुंबई उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती

September 2022
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  
    Oct »