Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी

केमिकलमुक्त आंबा खा !

On 3 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

अकोला : उन्हाळ्याची चाहुल लागताच सर्वांना आठवतो तो आंबा. पण आता आंब्याची अस्सल चव रासायनिक खतांच्या माऱ्यात हरवली आहे. यासाठी अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसआय) महत्वाचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे यापुढे ग्राहकांना अस्सल आंबा मिळणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून बाजारात मोठ्या प्रमाणात केमिकलच्या मदतीने पिकवलेल्या आंब्यांची विक्री वाढली आहे. केमिकलच्या मदतीने पिकवलेल्या आंब्यांना नैसर्गिक पद्धतीने पिकलेल्या आंब्यांसारखी चव नसते. हीच बाब लक्षात घेत आणि ग्राहकांची होणारी फसवणूक लक्षात घेत एफएसएसआयने हे पाऊल उचलले आहे.

एफएसएसआयच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आंबा पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कॅल्शियम कार्बाइडच्या वापरावर बंदी घातली आहे. कॅल्शियम कार्बाइड घातक वायू उत्सर्जित करते, ज्यामुळे अशा पिकवलेल्या आंब्याचे सेवन करणाऱ्या व्यक्तींना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

एफएसएसआयने कॅल्शियम कार्बाइडच्या वापरावर किंवा विक्रीवर बंदी घालण्याच्या सूचना राज्यांना तसेच अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यानंतरही याचा वापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या कडक इशाऱ्यासह एफएसएसआयने आंबा खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठीदेखील काही महत्वाची मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. यामध्ये आंबा किंवा इतर फळे खऱेदी करताना खात्री असणाऱ्या ठिकाणांवरूनच फळांची खरेदी करण्यास सांगितले आहे. याशिवाय कोणतेही फळ खाण्यापूर्वी ते चांगले धूण्यासचा सल्ला देण्यात आला आहे.

In बातमी

Post navigation

‘गीता जीवन ग्रंथ आहे’ -संध्या संगवई
तंत्रज्ञानाच्या जोरावर उंच झेपावणारे क्षेत्र : डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

माजी प्रधानमंत्री पी.व्ही.नरसिंह राव, आणि चौधरी चरणसिंग तसंच कृषीतज्ञ एम एस स्वामिनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 months Ago

दररोज हलासनाने मिळवा नैसर्गिक चमकदार व निरोगी त्वचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 4 years Ago

वऱ्हाड लोककला संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. गणेशचंदनशिवे

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 1 year Ago

YouTube  ची मोठी कारवाई, ९५ लाख व्हिडिओ डिलीट, भारत पहिल्या क्रमांकावर; कारण काय आहे ते जाणून घ्या

March 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Feb   Apr »