Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • काव्याधारा
  • बातमी
  • महाराष्ट्र

व्वारे पांडुरंगा!

On 3 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

शपथ घेऊन सांगतात,

आम्ही करु जनसेवा.

सत्ता देल्ली हातात की,

खात बसतात मेवा.

खड्ड्यात गेली जनता,

तुमचा खड्ड्यात गेला पक्ष.

खुर्ची कशी भेटेल ?

फक्त एवढ्यावरच लक्ष.

सोयर-ना-सुतक फक्त,

खुर्ची साठी मरतात.

तेच तुझी आषाढी ला,

पहीली पुजा करतात.

पापं जिथं धुतल्या जातात,

तेच बनते गंगा.

अजब तुझा न्याय राज्या,

व्वारे पांडुरंगा.!

नाही राहिला न्याय येथे,

नाही राहिली नीती.

भ्रष्टाच्यारी नेत्यांना,

फक्त ईडीचीचं भीती.

तिथेचं टेकले गुडघे त्यांचे,

कसा घेतील पंगा.?

अजब तुझा न्याय राज्या,

व्वारे पांडुरंगा.!

नेतेगीरीच्या नावाखाली,

हे गुंडगिरी करतात.

ह्या हेल्याईच्या टकरीत,

गोरगरीब मरतात.

कुठे लावतात भांडणं,

अन् कुठे करतात दंगा.

अजब तुझा न्याय राज्या,

व्वारे पांडुरंगा.!

देवस्थानच्या कारभारासाठी,

नेमतात विश्वस्त.

देवस्थानचा माल सारा,

तेचं करतात फस्त.

वाढपेच उठवतात,

पंगतीत बंगा.

अजब तुझा न्याय राज्या,

व्वारे पांडुरंगा. !

कोणाले म्हणावं नेता,

अन् कसा ओळखावं संत ?

हेच करून राह्यले,

साऱ्या देशाचा अंत.

धुवू धुवू  खाल्ला यायनं,

देश केला नंगा.

अजब तुझा न्याय राज्या,

व्वारे पांडुरंगा.!

भरमसाठ पगार असते,

तरी करतात संप.

पैसा नाही मावत त्याईच्या,

घरी पेट्रोल पंप.

पैस्याजवळचं पैसा जाते,

होत राह्यते चंगा.

अजब तुझा न्याय राज्या,

व्वारे पांडुरंगा.!

ज्याचा आहे माल इथं,

त्याचेच होतात येले.

मलिदा खाऊन फुगतात,

बाजारातले हेल़े.

पाणी घालते माळी,

अन् मकरंद खाते भुंगा.

अजब तुझा न्याय राज्या,

व्वारे पांडुरंगा.!

—————————————-

गणेश उत्तमराव साखरे

माहुली (धांडे) ता.- दर्यापूर

जि.- अमरावती.

मो.न.- ९९२१५४९०५५

In काव्याधारा बातमी महाराष्ट्र

Post navigation

जीवाची बंबई (व-हाडी लघुकथा)
Mobile | मोबाईल फोनची पन्नाशी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

आंतरराष्ट्रीय सीमेवरील शेतातही बंकर बांधले जाणार

  • बातमी
  • लोकप्रिय लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 4 years Ago

माहितीचा अधिकार!

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 9 months Ago

Indore | स्वच्छतेच्या बाबतीत इंदौर आंतरराष्ट्रीय स्तरावर

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

मुख्तार अन्सारी यांचा मृत्यू कसा झाला? दंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालात कारण समोर आले आहे

June 2023
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  
« May   Jul »