Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • आरोग्य
  • बातमी
  • महाराष्ट्र

आत्मविश्वासासाठी अर्ध व पूर्ण वृक्षासन

On 2 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

वृक्षासन हे दंडस्थितीतील आसन आहे. त्याचप्रमाणे आपण शयन आणि विपरीत शयनस्थितीतही वृक्षासन करू शकतो. वृक्ष म्हणजे झाड. या आसनाची झाडाप्रमाणे कल्पना केलेली आहे. हे दंड स्थितीमधील, म्हणजेच उभ्याने करण्याचे तोलात्मक आसन आहे. प्रथम दोन्ही पायांत थोडेसे अंतर घेऊन उभे राहावे. हाताच्या आधाराने डावा पाय गुडघ्यात वाकवून हळूहळू वर घ्यावा व पायाचा तळवा उजव्या मांडीच्या आतल्या बाजूला टेकवावा. पाय स्थिर राहिल्यावर दोन्ही हात श्वास घेत बाजूने वर घ्यावे. नमस्कार स्थितीमध्ये असावे. दोन्ही कोपरे ताठ असावेत. दोन्ही दंड दोन्ही कानांना टेकलेले असावेत. साधारण 30 सेकंद ते एक मिनिटापर्यंत आसनस्थिती टिकविण्याचा प्रयत्न करता येतो. अशा पद्धतीने एकदा डावा पाय आणि एकदा उजवा पाय वर घेऊन आपण अर्ध वृक्षासन करू शकतो. ज्यावेळी आपण दोन्ही हात नमस्कार स्थितीत डोक्यावर घेतो आणि श्वास घेत पायांच्या टाचा वर उचलतो नजर एका बिंदूकडे स्थिर करतो त्यावेळी पूर्ण वृक्षासन होते. अर्धवृक्षासन आणि पूर्ण वृक्षासन दोन्ही करायला सोपी वाटली तरी टिकवायला अवघड असतात.

सुरुवातीला तोल सांभाळणे अवघड जाते. अशावेळी अर्धवृक्षासन करताना भिंतीच्या आधाराने या आसनाचा सराव करावा अथवा योग्य योगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे आसन करावे. आसन सोडताना सावकाश पाय जागेवर घ्यावेत. श्वास सोडत हात जागेवर घ्यावेत. पूर्ण वृक्षासनात आपण शंभर आकडे मोजून स्थिर राहू शकतो. सर्व आसनाचा दररोज सराव झाल्यानंतर वर्ग संपविताना म्हणजेच प्राणायाम आणि आसने पूर्ण झाल्यावर शरीराचा ताण घालविण्यासाठी वृक्षासन केले जाते. अर्ध आणि पूर्ण अशी दोन्हीही वृक्षासने एकदिवसाआड करावीत. वृक्षासनाचे अनेक फायदे आहेत. उंची वाढविण्यासाठी 14 वर्षाच्या पुढील मुलामुलींना वृक्षासन रोज नियमित करवून घेतले असता योगप्रयोगांती त्यांची उंची वाढली असल्याचे सिद्ध झाले आहे म्हणून शाळेमध्ये हे आसन रोज घेतले जाणे गरजेचे आहे. या आसनाचे इतर फायदे असे. याच्यामुळे मनाची एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती वाढते. चिडचिड कमी होते, आकलनक्षमता वाढण्यास मदत होते. हात वरच्या दिशेला ताणले असल्याने मुलांना उंची वाढविण्यासाठी तर हे आसन उपयुक्त आहेच. पण आपले ताणतणाव घालवण्यासाठी, आपले हातापायांचे मजबुतीसाठी, उत्तम रक्ताभिसरणासाठी, नेत्रदोष जाण्यासाठी, शरीर आणि मनाचा समतोल राखण्यासाठी तसेच आपले व्यक्तिमत्त्व प्रगल्भ करण्यासाठी वृक्षासन नियमित करावे. ज्येष्ठांची गुडघेदुखी, टाचदुखी, कंबरदुखी दूर करणारे हे आसन आहे. एकंदर रोजच्या दिवसाची सुरुवात आत्मविश्वासाने करण्यासाठी वृक्षासन हे रोज करायलाच हवे.

In आरोग्य बातमी महाराष्ट्र

Post navigation

नैराश्य अन् शरीराच्या उच्च तापमानाचा संबंध
शौचालय में मोबाइल ठीक नहीं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, गायीला दिला ‘राज्य माते’चा दर्जा

  • बातमी
  • महाराष्ट्र
  • विशेष लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

शुभ माना जाता है घर में हाथी के जोड़े की मूर्ति को रखना

  • बातमी
  • महाराष्ट्र
  • विशेष लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

Eknathrao Shinde | समृद्धी महामार्गाच्या पूर्णत्वाने मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंचे कर्तुत्व सिद्ध

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

तुळजाभवानी देवीच्या मंदिर जीर्णोध्दार कामाचा शुभारंभ

February 2024
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
26272829  
« Jan   Mar »