Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • आरोग्य
  • बातमी
  • महाराष्ट्र

पायी चालणे सर्वार्थाने फायदेशीर

On 2 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

जगभरातील संशोधकांनी दररोज भरपूर चालण्यामुळे व्यक्ती तंदुरुस्त राहतो, यावर शिक्कामोर्तब केले आहे. दररोज किमान दहा हजार पावले चालणारा व्यक्ती हा फिजिकली अॅक्टिव्ह श्रेणीत मोडतो. तर किमान ५ हजार पावले चालणारा व्यक्ती हा सिडेंट्री लाइफस्टाईल म्हणजेच आळशी जीवनशैलीचे अनुकरण करणारा असतो. ५००० ते ७५०० पावले चालणारा कमी सक्रिय, १२५०० पेक्षा अधिक पावले चालणारा व्यक्ती हायली अॅक्टिव्ह समजला जातो. परंतु, दहा हजार पावले फिरणे आदर्श असून ही कृती केल्यास आपण दररोज पाच किलोमीटर चालतो, असे गृहित धरायला हवे.

ब्रिटनच्या ‘नॅशनल ओबेसिटी फोरम’ने या गोष्टीला मान्यता देत काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आणि त्यानुसार चालण्यावर लक्ष ठेवण्यासाठी फिटनेस ट्रॅकर बँडही तयार केले. जागतिक संशोधन संस्था आयडीसीची ट्रॅकर वापरण्याबाबतची गोष्ट मान्य झाली आणि २०१९ पर्यंत शंभर दशलक्ष ट्रॅकर उपकरणाची विक्री झाली. अशा प्रकाराच्या आरोग्य उपकरणाच्या मदतीने आपण दिवसभरात किती पावले चाललो किंवा सकाळच्या वेळी किती फिरलो याचे आकलन होते. त्याचवेळी किती कॅलरी बर्न झाली याचेही विवरण दिले जाते. 

बेस्ट सेलर बुक ‘मानपोई: द आर्ट अँड सायन्स ऑफ स्टेप काउंटिंग’च्या लेखिका कॅटरिन टुडोर लॉक यांनी दररोज दहा हजार पावले चालण्याचे महत्त्व विशद केले. या संदर्भात त्यांनी टेनेसी यूनिव्हर्सिटीच्या एक्सरसाईज फिजिओलॉजीचे प्रोफेसर डॉ. डी. आर बॅसेट यांच्या समवेत एक वैद्यकीय पेपरही लिहला आणि विविध अभ्यासांती १० हजार पावले दररोज चालण्यामुळे होणारे फायदे देखील सांगितले. नियमित चालण्यामुळे हेल्दी हार्ट, हेल्दी डायजेस्टिव्ह सिस्टम, बॉडी फिटनेस राहण्यास मदत मिळते. आतापर्यंत डझनभर संशोधकांनी हेल्दी हार्ट आणि स्ट्रोकपासून बचाव करण्यासाठी अॅक्टिव्ह जीवनशैली असणे आवश्यक आहे. शारीरिक रुपाने असक्रिय लोकांत हृदयविकार होणे आणि स्ट्रोकची शक्यता बळावते. कोणताही व्यायाम किंवा अॅक्टिव्हिटी सुरू करण्यापूर्वी आपण फिजिकल ट्रेनर किंवा डॉक्टरचा सल्ला घ्यायला हवा. आपण किती वेळ व्यायाम करू शकता आणि किती तीव्रतेने करु शकता, हेदेखील जाणून घ्या. कारण प्रत्येक व्यक्ती शारीरिक क्षमता वेगवेगळी असते.

In आरोग्य बातमी महाराष्ट्र

Post navigation

वातावरणातील बदलांचे आव्हान पेलण्यासाठी कृषी पदवीधरांनी संशोधनाला चालना द्यावी – राज्यपाल रमेश बैस
फसवनारा भामटा…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 5 months Ago

क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

अपने संकल्प पहले न बताएं, उन्हें निभाना दोगुना कष्ट देगा

  • आरोग्य
  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

हृदयविकाराच्या झटक्याने इतर गंभीर आजारांचा धोका वाढतो

  • बातमी
  • महाराष्ट्र
  • विशेष लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 1 year Ago

eliminating enemies | भारताच्या शत्रूंना कोण संपवत आहे? कुलभूषण जाधव यांचे अपहरण करणाऱ्या मुफ्तींना ISI नेही ओळखले नाही

February 2024
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
26272829  
« Jan   Mar »