Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र

माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांचं निधन

On 2 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर आज दुपारी मुंबईत दादर इथल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांची प्रकृती खालवल्यानं त्यांना २१ तारखेला हिंदुजा रुग्णालयात दाखल केलं होतं, तिथेच त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला. त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी माटुंगा इथल्या त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलं आहे. दुपारी २ वाजता अंत्ययात्रा सुरू होईल.

मनोहर जोशी यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ला रायगड जिल्ह्यातल्या नांदवी या गावी झाला. महानगरपालिकेत दोन वेळा नगरसेवक, तीन वेळा विधानपरिषद सदस्य, मुंबईचे महापौर, दोन वेळा विधानसभा सदस्य, विधानसभेतील विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, केंद्रीय अवजड आणि सार्वजनिक उद्योग मंत्री, लोकसभा सभापती,  राज्यसभा खासदार अशा विविध राजकीय भूमिकेत ते  दिसले.  १९६७ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आपलं संपूर्ण राजकीय आयुष्य त्यांनी शिवसेना पक्षासाठी वेचलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या जोशी यांचा शिवसेना संघटित करण्यात मोठा वाटा होता. १९९५ मध्ये शिवसेना- भाजप युती राज्यात सत्तेवर आल्यानंतर ते राज्याचे पहिले बिगर-काँग्रेस मुख्यमंत्री झाले. वयाच्या ७२ व्या वर्षी  त्यांनी शिवसेनेवर विश्लेषणात्मक अभ्यास करुन पीएच.डी. पूर्ण केली. त्यांना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून सन्मानार्थ डी. लिट. ही मानद पदवी मिळाली. मराठी तरुणांना स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण मिळून ते स्वतःच्या पायावर उभे राहावेत यासाठी त्यांनी ‘कोहिनूर’ ही तांत्रिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणारी संस्था सुरु केली. नंतर ही संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. सर या नावाने परिचित असलेले जोशी यांच्याबद्दल प्रत्येकालाच आदर आणि जिव्हाळा  वाटत असे. 

In बातमी महाराष्ट्र

Post navigation

महाराष्ट्रातले भाजपा आमदार राजेंद्र पटणी यांचं निधन
विदर्भस्तरीय पत्रकारांची एकविसीय कार्यशाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

पंतप्रधान मोदींच्या वडनगर गावी २,८०० वर्षे जुन्या वस्तीचे पुरावे; आतापर्यंत सापडले एक लाखाहून अधिक अवशेष

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

शासनमान्य ग्रंथालयांना पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

  • बातमी
  • महाराष्ट्र
  • विशेष लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

शरीरावरील तीळ खूप काही सांगतात

  • बातमी
  • लोकप्रिय लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 4 years Ago

कला, साहित्य आणि सामाजिक पातळीवर देखील दिलेले चांगले योगदान प्रेरणादायी

February 2024
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
26272829  
« Jan   Mar »