Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र

Kisan Credit Card |किसान क्रेडिट कार्डची मर्यादा आता ५ लाख

On 1 year Ago
VARHADVRUTT WEB TEAM

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष २०२५ -२०२६ साठीचा अर्थसंकल्प मांडला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेची मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. पूर्वी ही मर्यादा फक्त ३ लाख रुपये होती. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात मांडलेल्या किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना २ लाख रुपयांचा अतिरिक्त फायदा मिळणार आहे. तसेच, देशातील लाखो शेतकरी किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेऊ शकतील. किसान क्रेडिट कार्डसोबतच बचत खात्याचाही लाभ मिळत आहे. किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे आणि शेतकऱ्यांना हे कार्ड १५ दिवसांच्या आत मिळते. किसान क्रेडिट कार्ड योजनेद्वारे शेतकऱ्यांना ४ टक्के व्याजदराने ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळत होते. आता ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार  आहे. या योजने अंतगत शेतकऱ्यांना अनुदान देखील मिळते. म्हणजे जर शेतकरी वेळेवर कर्ज फेडत असेल तर त्याला ३ टक्के अनुदान मिळते. किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. किसान क्रेडिट कार्डसाठी बँका, पंचायत आणि जिल्हा प्रशासन एकत्र काम करत आहेत. त्यामुळे तुम्हाला किसान क्रेडिट कार्डसाठी सर्वात आधी तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा लागेल. बँकेत जाऊन बँकेच्या कर्मचाऱ्याकडून किसान क्रेडिट कार्ड अर्ज फॉर्म घ्यावा लागेल. यामध्ये सर्व आवश्यक माहिती भरून द्यावी लागेल. दरम्यान, शेतकऱ्यांना १५ दिवसांच्या आत कार्ड मिळते.

In बातमी महाराष्ट्र

Post navigation

शिवछत्रपतींची शिवछत्रपती आणि नेपाळ !
Rathasaptami | रथसप्तमी व्रतपूजन / सप्तमीचे महत्व

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 3 months Ago

कर्जमाफी प्रक्रियेला वेग, पण KYC अभावी अकोल्यातील १,५५८ शेतकरी अडचणीत

  • बातमी
VARHADVRUTT WEB TEAM
On 9 months Ago

Vedic Clock | ‘विक्रमादित्य वैदिक घड्याळ’ भारतीय परंपरेचे अभिमानास्पद प्रतीक!

  • बातमी
  • महाराष्ट्र
  • विशेष लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 1 year Ago

आयुष्मान भारत योजनेचे निकष बदलणार?

  • महाराष्ट्र
  • लोकप्रिय लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 3 years Ago

विदर्भाचा सत्यानाश अजून किती काळ होऊ देणार?

February 2025
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
2425262728  
« Jan   Mar »